Paris Olympic 2024, PV Sindhu Post esakal
क्रीडा

सुंदर प्रवास, पण...! ऑलिम्पिकमधील पराभवानंतर PV Sindhu भविष्याबाबत स्पष्टच बोलली

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024, PV Sindhu Post - भारताची स्टार बॅडमिंटन पटू पी. व्ही सिंधू हिला काल पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. २०१६ ची रौप्यपदक विजेती आणि २०२०च्या कांस्यपदक विजेत्या सिंधूला तिसरे ऑलिम्पिक पदक जिंकता आले नाही. चीनच्या खेळाडूने सरळ गेममध्ये तिचा पराभव केला आणि भारतीय खेळाडूचे आव्हान संपुष्टात आणले. या पराभवानंतर सिंधूने भावनिक पोस्ट लिहिली.

''मी पराभूत झाले हे सत्य स्वीकारायला वेळ लागेल, पण कालांतराने तो स्वीकारून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहीन,''असे सिंधूने लिहीले. चिनी खेळाडू बिंग जिआओ हे हिने २१-१९ व २१-१४ असा सहज विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Paris 2024: A Beautiful Journey but a Difficult Loss अशा शिर्षकाखाली सिंधू लिहिते की,''पॅरिस २०२४ चा प्रवास ही एक लढाई होती. मागील दोन वर्षे दुखापतीमुळे मी खेळापासून बराच काळ दूर होते. या आव्हानांना न जुमानता मी येथे उभी राहिली आणि तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करू शकले हे मी माझे भाग्य समजते. ''

''या स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आणि त्याहूनही महत्त्वाचे एका पिढीला प्रेरणा देण्यासाठी, मी स्वतःला भाग्यवान समजते. या काळात तुमचा पाठिंबा, शुभेच्छा हा खूप मोठा दिलासा देणारा ठरला आहे. मी आणि माझ्या टीमने पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये सर्वकाही दिले आणि कोणतीच दिलगिरी न बाळगता आम्ही कोर्टवरून माघारी परतलो आहोत,''असेही तिने लिहिले.

भविष्याबाबत...

माझ्या भविष्याबाबत, मी स्पष्ट करू इच्छिते की, मी पुढेही खेळत राहणार. पण तुर्तास एक छोटा ब्रेक घेत आहे. माझे शरीर आणि माझ्या मनाला त्याची गरज आहे. पुढच्या प्रवासाची रुपरेषा नियोजितपणे आखून पुढे चालत राहू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

Jarange Health Update: उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी केल्या कडक शब्दांत सूचना

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

IND vs BAN: अ‍ॅक्शन रिप्ले! Rohit Sharma दुसऱ्या डावातही फसला; एकाच पद्धतीने पुन्हा OUT झाला, जैस्वालही गंडला

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्सने 1400 अंकांनी वाढला, निफ्टी 25,800च्या वर

SCROLL FOR NEXT