IND vs AUS Team India Playing 11 : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 पूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबरला मोहाली येथे खेळवला जाणार आहे. दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 24 सप्टेंबरला तर तिसरा सामना हा राजकोटवर 27 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
अजित आगरकरच्या नेतृत्वातील राष्ट्रीय नविड समितीने या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्याचं ठरवलं आहे. वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघातील खेळाडू दुखापग्रस्त होऊ नयेत म्हणून ही काळजी घेण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्याने तो वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. त्याच्या ऐवजी संघात रविचंद्रन अश्विनची निवड करण्यात आली आहे.
जर अक्षर पटेल ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील तिसरा वनडे सामना खेळू शकला नाही तर ती टीम इंडियासाठी चिंतेची बाब असणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ आपली कोणती प्लेईंग 11 मैदानात उतरू शकतो हे पाहू.
भारताची अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन हा जवळपास 21 महिन्यांनी वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. त्याने जानेवारी 2022 मध्ये भारताकडून आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता.
भारताची संभाव्य प्लेईंग 11 :
इशान किशन, शुभमन गिल, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग 11 :
डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, मार्कस स्टॉयनिस, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, नाथन एलिस, एडम झाम्पा, जोश हेजलवूड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.