Rachin Ravindra Father Denies Naming Son After Sachin And Dravid : न्यूझीलंड संघाचा खेळाडू रचिन रवींद्रने 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या कामगिरीने सर्व चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्या आवृत्तीत न्यूझीलंडसाठी तीन शतके झळकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे, आणि सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतही तो तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय वयाच्या 25व्या वर्षी धावा करण्याच्या बाबतीत रचिनने महान सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.
रचिन नावामागची खरी स्टोरी
यंदाच्या वर्ल्ड कपमधील धमाकेदार खेळीमुळे रचिन रवींद्र चर्चत आला आहे, आणि त्याच्या नावाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातील सर्वात लोकप्रिय चर्चा होती सचिन आणि राहुलच्या चाहत्यांची.
खरे तर सचिन आणि राहुल द्रविड यांच्या नावाचा प्रभाव रचिनच्या नावावर असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र आता रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून नावामागील सत्यही उघड केले आहे.
नावामागील सत्य आहे तरी काय?
रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती यांनी 'द प्रिंट'शी बोलताना रचिनच्या नावामागील किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, 'जेव्हा रचिनचा जन्म झाला तेव्हा त्याच्या पत्नीने हे नाव सुचवले. त्यावर आम्ही फारशी चर्चाही केली नाही. नाव छान वाटलं आणि स्पेलिंगही सोपं होतं म्हणून हे नाव ठेवलं. पण हे नाव सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावाशी जुळले हे काही वर्षांनी लक्षात आले. त्याला क्रिकेटर बनवण्याच्या किंवा तसं काही करण्याच्या उद्देशाने आम्ही हे नाव ठेवलं नाही.
रचिनने आपल्या संघासाठी आतापर्यंत 3 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 18 टी-20 सामने खेळले आहेत. मात्र पदार्पणाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंड संघाने पावव्यांदा उपांत्य फेरी गाठण्यात रचिनने सर्वात मोठे योगदान दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.