Indian Cricket Team Coach Rahul Dravid sakal
क्रीडा

Team India: राहुल द्रविडची कोचिंग कारकीर्द संपली? वर्ल्ड कपसाठी BCCI चा नवीन प्लान तयार

भारतीय T20 संघासाठी परदेशी प्रशिक्षक!

Kiran Mahanavar

Indian Cricket Team Coach Rahul Dravid : भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेने करणार आहे. यादरम्यान तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवल्या जाणार आहे, जी 3 जानेवारीपासून मुंबईत सुरू होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दोन्ही मालिकेसाठी संघाची निवड केली आहे. हार्दिक पांड्या टी-20 फॉरमॅटमध्ये संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. दरम्यान बीसीसीआय आणखी एका योजनेवर काम करत असल्याची बातमी आली आहे.

बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची निवड केली आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. निवडीसोबतच बीसीसीआयने या फॉरमॅटमध्ये मोठ्या बदलांवर काम करत असल्याचे संकेत दिले आहेत. हार्दिक पांड्याला टी-20 मध्ये नियमित कर्णधार बनवले जाऊ शकते आणि त्याची सुरुवात श्रीलंका मालिकेपासूनच होईल अशी अपेक्षा आहे.

कर्णधारासोबतच बीसीसीआय आता कोचिंग स्तरावरही बदल पाहत आहे. इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार बीसीसीआय आधीच टी-20 मध्ये राहुल द्रविडचा पर्याय शोधत आहे, ज्यामध्ये परदेशी प्रशिक्षकाचा समावेश आहे. मात्र क्रिकेट सल्लागार समितीशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत अहवालात दावा करण्यात आला आहे की, आता बोर्डाचे संपूर्ण लक्ष टी-20 वर नाही तर एकदिवसीय विश्वचषकावर आहे.

वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही अनेक पर्याय शोधत आहोत. आमच्या प्लॅन्समध्ये राहुल सर्वात वर आहे पण त्याच्यावरही कामाचा भार आहे. आमचे संपूर्ण लक्ष घरच्या मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. आपल्याला विश्वचषक जिंकायचा आहे, हा संदेश सर्वांना स्पष्ट आहे. त्यामुळे स्पष्ट कारणांमुळे सध्या टी-20 वर लक्ष केंद्रित केलेले नाही. विविध चर्चा होत आहेत परंतु अंतिम निर्णयासाठी सीएसी आणि निवडकर्त्यांना अंतिम निर्णय घ्यावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT