shoaib akhtar on rahul dravid and Virat Kohli Sakal
क्रीडा

द्रविडसंदर्भात अख्तरचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

सुशांत जाधव

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील ढिसाळ कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar ) मोठ वक्तव्य केले आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid ) समोर स्वत:ला सिद्ध करण्याचे मोठं आव्हान निर्माण झाल्याचे त्याने म्हटले आहे. कोच म्हणून उगाचच फुगवून उभे केलेले नाही, हे राहुल द्रविडला सिद्ध करावे लागेल, असे अख्तर म्हणाला.

एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन काढून टाकल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 1-2 अशी गमावल्यानंतर कोहलीने टेस्ट कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिके विरुद्धची वनडे मालिकाही गमावली.

अख्तर सध्या लीजेंड्स लीग क्रिकेट टी20 स्पर्धेत खेळताना दिसत आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने भारतीय क्रिकेटसंदर्भात मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला की, "बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि अन्य लोक सध्या काय विचार करतात याचा अंदाज नाही. परंतु भारतीय क्रिकेट सध्या सर्वोच्च स्तरावर आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला परदेशात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. याचा ते कसा विचार करतात माहित नाही. या पराभवामुळे भारतीय संघाची कामगिरी ढासळलीये असं म्हणता येणार नाही. पण राहुल द्रविडसमोर मोठे आव्हान आहे, हे स्पष्ट दिसत आहे. रवि शास्त्री यांच्या जागेवर तो आला आहे. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने सर्वोच्च कामगिरी करुन दाखवलीये. त्यामुळे द्रविडसमोर एक मोठे आव्हान आधीपासूनच आहे, असे अख्तरनं म्हटलं आहे.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानंच भारतीय ड्रेसिंग रुममध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र समोर आले होते. त्यावेळी मी दुबईमध्ये होतो. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरणाची कल्पना होती. त्यामुळे विराट कोहलीच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही, असेही अख्तर यावेळी म्हणाला. ड्रेसिंग रुममधील वातावरण कोहलीच्या विरोधात होते. त्यामुळे त्याला नेतृत्व सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

भारतीय संघाच्या ताफ्यातील इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील मैदानात अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. गाडीचं टायर जसे बदलतात तसेच जलदगती गोलंदाजांना बदलण्याची गरज असते. ईशांत, शमी, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार करियरच्या अंतिम टप्प्यात आहेत. भारतीय संघाला यांचे पर्याय शोधावे लागतील, असा सल्लाही त्याने यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT