Rahul Dravid Statement About Including Hardik Pandya In Team India Leadership Group ESAKAL
क्रीडा

पांड्या टीम इंडियाच्या लिडरशिप ग्रुपमध्ये; द्रविडने काय दिले उत्तर?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी 20 सामन्यांची मालिका येत्या 9 जून पासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर होत आहे. आयपीएल 2022 नंतर टीम इंडियाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका आहे. आयपीएलमधील कामगिरीची छाप मालिकेसाठी निवडल्या गेलेल्या संघावर आहे. यंदाचा आयपीएल हंगाम संघात पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने जिंकला. त्याच्या नेतृत्व गुणांची चांगलीच चर्चा या हंगामात रंगली. आता टीम इंडियात देखील त्याला नेतृत्वाबाबतची काही भुमिका मिळते का याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गुजरात टायटन्सला पहिले आयपीएल टायटल जिंकून देणारा हार्दिक टीम इंडियाच्या लिडरशिप ग्रुपमध्ये (Team India Leadership Group) आहे का असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर राहुल द्रविड म्हणाला की, 'मी हार्दिकला काही तासांपूर्वीच भेटलो आहे. आयपीएलमध्ये त्याने प्रभावी नेतृत्व केले. त्याने कामगिरी देखील चांगली केली. मला असे वाटते की एखाद्या लिडरशिप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला लिडर म्हणून संबोधले जाणे गरजेचे नाही.'

द्रविड पुढे म्हणाला, 'पुढे काय होणार, एखादा व्यक्ती संघाचे नेतृत्व करणार की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. निवडसमिती त्यांच्या आकलनानुसार त्यांच्या निरिक्षणानुसार पुढचा निर्णय घेतील. यात खेळाडूंच्या उपलब्धतेचाही विषय येतो. आयपीएलमध्ये अनेक भारतीय कर्णधारांनी चांगली कामगिरी केली आहे ही एक चांगली बाब आहे. हार्दिक देखील त्यातील एक आहे. लखनौसाठी राहुलने चांगली कामगिरी केली आहे. संजू सॅमसनने राजस्थानचे चांगले नेतृत्व केले. श्रेयसने केकेआरचे नेतृत्व केले. यामुळे एक खेळाडू म्हणून जडणघडण होण्यास मदत होते. निर्णय क्षमता वाढल्याने व्यक्ती म्हणूनही तुमची जडणघडण होते.'

राहुल द्रविड हार्दिक पांड्याबद्दल म्हणाला की, 'सध्याच्या घडीला आमच्या दृष्टीने त्याने पुन्हा गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे हे चांगले आहे. तुम्हाला माहिती आहे की हे आमच्यासाठी किती महत्वाचे होते. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आमच्या संघाला एक डेप्थ प्राप्त होते. त्यामुळे क्रिकेटर म्हणून, त्याच्याकडून गोलंदाजीत आणि फलंदाजीत चांगली कामगिरी करवून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT