Rahul Dravid 
क्रीडा

IND vs SL : राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच

नामदेव कुंभार

श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी माजी कर्णधार राहुल द्रविडची (Rahul dravid) नेमणूक झाल्याचं वृत्त आहे. एएनआयनं बीसीसीआयमधील (BCCI) सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान जुलैमध्ये मालिका होणार आहे. यासाठी अद्याप भारतीय संघाची निवड झालेली नाही. मात्र, सात वर्षानंतर राहुल द्रविड टीम इंडियासोबत जोडला गेला आहे. माजी कर्णधार राहुल द्रविड भारताच्या अंडर-19 सघाचा प्रशिक्षक आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) चा प्रमुख आहे. याआदी 2014 मध्ये राहुल द्रविड इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा फंलदाजी सल्लागार होता. (Rahul Dravid to coach Indian team on Lanka tour )

भारतीय संघ (Team India) जुलैमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर (Indian team on Lanka tour)जाणार आहे. 3 वनडे आणि 3 टी -20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ नव्या रणनितीसह मैदानात उतरावे लागणार आहे. एका बाजूला इंग्लंडमधील कसोटी मालिका आणि दुसऱ्या बाजूला श्रीलंका दौरा यामुळे मर्यादीत षटकाच्या सामन्यासाठी वेगळा संघ निवडला जाणार आहे.

सीनिअर टीममधील विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय नवोदितांचा भरणा असलेला संघ श्रीलंका दौऱ्यावर जाईल. युवा खेळाडूंसाठी श्रीलंका दौरा खूप महत्त्वपूर्ण असेल. आयपीएलमध्ये चमकलेल्या आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर संधी दिली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT