India vs Nepal U-19 Asia Cup eSakal
क्रीडा

IND vs NEP : पाकविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे दमदार पुनरागमन! 50 षटकांचा सामना 43 चेंडूत जिंकला, उपांत्य फेरी पक्की?

उपशीर्षक: भारतीय युवा संघाची नेपाळवर दणदणीत मात; उपांत्य फेरीची दिशा स्पष्ट!

Kiran Mahanavar

India vs Nepal U-19 Asia Cup : आशियाई क्रिकेट परिषद अंडर-19 आशिया कपचा 10 वा सामना 12 डिसेंबरला भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. दुबईतील आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी ग्राउंड क्रमांक 2 वर दोन्ही संघ आमनेसामने आले.

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात टीम इंडियाने नेपाळला एकतर्फी 10 गडी राखून पराभूत करून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. हा विजय मिळवून देण्यात राज लिंबानीच्या किलर बॉलिंगने महत्त्वाची भूमिका बजावली.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार उदय सहारनने नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला आणि नेपाळचा संपूर्ण संघ 52 धावांत गडगडला.

टीम इंडियाने नेपाळने दिलेले 53 धावांचे लक्ष्य गाठले आणि 7.1 षटकात बिनबाद 57 धावा केल्या. सलामीवीर अर्शीन कुलकर्णीने 30 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 43 धावा केल्या तर आदर्श सिंग 2 चौकारांच्या मदतीने 13 धावा करून नाबाद परतला.

टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला राज लिंबानी

या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज राज लिंबानी टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला होता. राज लिंबानीने 1.41 च्या इकॉनॉमीसह 9.1 षटकात केवळ 13 धावा दिल्या आणि 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यादरम्यान राज लिंबानीने 3 मेडन षटकेही टाकली. (Raj Limbani became the hero of Team India's victory)

नेपाळला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्याचे 3 सामन्यांत 2 विजयांसह 4 गुण झाले आहेत. भारताचा नेट रन रेटही 1.856 वर पोहोचला आहे.

त्याचबरोबर पाकिस्तान संघाचेही 4 गुण आहेत, मात्र नेट रनरेटमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानविरुद्ध तो शेवटचा सामना खेळणार आहे. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर येईल आणि भारत-पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT