sport sakal
क्रीडा

Vijay Hazare Trophy : हरियानाने हजारे करंडक पटकावला! राजस्थानचा संघ उपविजेतेपदाचा मानकरी

सकाळ वृत्तसेवा

सुमीतकुमारची अष्टपैलू चमक व अंकितकुमार, अशोक मेनारिया यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हरियाना संघाने शनिवारी विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट करंडकाच्या अजिंक्यपदावर रुबाबात मोहोर उमटवली. हरियाना संघाने अंतिम फेरीच्या लढतीत राजस्थानवर ३० धावांनी विजय मिळवला.

हरियानाकडून राजस्थानसमोर २८८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. राजस्थानला मात्र २५७ धावांपर्यंत मजल मारता आली. अभिजीत तोमर याने १०६ धावांची खेळी करताना १० चौकार व २ षटकार मारले. त्याने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच कुणाल सिंग राठोड याने ७९ धावांची खेळी केली. मात्र दोघांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. हरियानाकडून सुमीतकुमार व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले.

त्याआधी हरियाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अंकितकुमारने ८८ धावांची आणि अशोक मेनारियाने ७० धावांची खेळी केली. सुमीतकुमारने १६ चेंडूंमध्ये नाबाद २८ धावा केल्या. हरियानाला ८ बाद २८७ धावांपर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक : हरियाना ५० षटकांत ८ बाद २८७ धावा (अंकितकुमार ८८, अशोक मेनारिया ७०, अनिकेत चौधरी ४/४९) विजयी वि. राजस्थान ४८ षटकांत सर्व बाद २५७ धावा (अभिजीत तोमर १०६, कुणाल सिंग राठोड ७९, सुमीतकुमार ३/३४, हर्षल पटेल ३/४७)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lakshman Hake: लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप! पुण्यात हाके-मराठा आंदोलकांमध्ये वाद

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT