Ramiz Raja PCB Chairmen : नुकत्याच पाकिस्तानात झालेल्या तीन कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंडने 3 - 0 अशी खिशात घातली. पाकिस्तानचा पहिल्यांदाच मायदेशात व्हाईट वॉश झाला यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन रमीझ राजा यांची त्वरित उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी आता नजाम सेठी यांची नियुक्ती करण्यातआली आहे. या कारवाईनंतर रमीझ राजांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
रमीझ राजांची उचलबांगडी केल्यानंतर नजाम सेठी यांनी आल्या आल्या काही मोठे निर्णय घेतले. त्यांनी निवडसमितीचे अध्यक्ष आणि माजी वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडू मोहम्मद वसिम यांना काढून टाकले. यानंतर रमीझ राजा यांनी आपल्या यूट्यूबवरून प्रतिक्रिया दिली.
रमीझ राजा म्हणाले की, 'एक माणूस आला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सगळी घटनाच बदलली. तुम्ही पीसीबीची घटना बदलणार होताच मात्र हंगाम सुरू असताना, इतर देश पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला येत असताना तुम्ही हे केले. असं जगात कुठं होत नाही. तुम्ही निवडसमिती प्रमुखाला देखील काढून टाकले. मोहम्मद वसिम चांगलं काम करत होते की नाही हे वेगळा विषय. मात्र ते माजी कसोटी खेळाडू आहेत. तुम्हाला त्यांची पाठवणी सन्मानाने करता आली असती.' (Sports Latest News)
रमीज राजा पुढे म्हणाले की, 'हे नजाम सेठी मध्यरात्री 2.15 ला ट्विट करतात की रमीझ राजा यांना काढून टाकण्यात आले आहे. कहर म्हणजे ते माझे अभिनंदन करतात. त्यांनी मला माझ्या कार्यालयातील माझ्या वस्तू देखील घेऊ दिल्या नाहीत. मी कसोटी क्रिकेट खोळलो आहे. हे माझं ग्राऊंड आहे. क्रिकेटच्या बाहेरची लोकं येतात आणि आपण मसिहा असल्यासारखे वागतात. मला त्यांचे क्रिकेट व्यतिरिक्त असलेले हितसंबंध माहिती आहेत. ही लोकं फक्त प्रकाशझोतात राहण्यासाठी इथे आली आहेत.'
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.