बंगळूर : सर्वाधिक ४१ वेळा रणजी करंडक जिंकलेला मुंबईचा संघ उद्यापासून सुरू होणाऱ्या उपांत्य लढतीत उत्तर प्रदेशशी सामना करणार आहे. या वेळी तब्बल पाच वर्षांनंतर रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठण्याची संधी मुंबईकडे असणार आहे. याआधी २०१६-१७ मध्ये मुंबईने रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती; पण गुजरातने मुंबईला हरवत पहिल्यांदाच रणजी जिंकण्याचा मान संपादन केला होता. याप्रसंगी मुंबईच्या संघासमोर उत्तर प्रदेशचे आव्हान असून त्यांना कमी लेखून चालणार नाही. (Ranji Trophy 2022 News)
मुंबईने उत्तराखंडवर ७२५ धावांनी विश्वविक्रमी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता हाच फॉर्म कायम ठेवण्यासाठी मुंबईचा संघ प्रयत्नशील असेल. मुंबईची फलंदाजी ताकतवर आहे. यशस्वी जैसवाल, सर्फराझ खान, सुवेद पारकर या फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला आहे. या तिन्ही फलंदाजांकडून मागील लढतीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल. कर्णधार पृथ्वी शॉच्या फलंदाजीकडे या वेळी नजरा खिळल्या असतील. अरमान जाफरकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. दुखापतीमुळे आदित्य तरेला उर्वरित रणजी मोसमामधून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याऐवजी हार्दिक तामोरे याला संघात संधी दिली जाईल.
बंगाल - मध्य प्रदेशमध्ये लढत
बंगाल - मध्य प्रदेश यांच्यामध्ये दुसरी उपांत्य लढत खेळवण्यात येणार आहे. ही लढतही उद्यापासून बंगळूर येथेच पार पडेल. बंगालने आतापर्यंत दोन वेळा रणजी करंजक जिंकलेला असून मध्य प्रदेश/होळकर या संघांनी चार वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.