Ranji Trophy : बाद फेरी गाठायची असेल तर पुढील सर्व सामन्यांत बोनस गुणांसह विजय आवश्यक असलेल्या महाराष्ट्राची विदर्भविरुद्ध कालपासून सुरू झालेल्या रणजी सामन्यात पीछेहाट झाली. २०८ धावांत त्यांचा संघ बाद झाला. त्यानंतर विदर्भाने १ बाद १११ अशी सुरुवात केली.
यंदाच्या मोसमात चांगली सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्राचा संघ सातत्यात कमी पडत आहे. आज त्यांचा संघ ५६.४ षटकांतच गारद झाला. आंतरराष्ट्रीय अनुभव असलेला उमेश यादव विदर्भ संघातून या सामन्यात खेळत नसला तरी महाराष्ट्राचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. ११ व्या क्रमांकावरील मनोज इंगळेने सर्वाधिक ३६ धावा केल्या. इतकी वाईट अवस्था महाराष्ट्राच्या फलंदाजीची झाली.
दोन चौकार आणि चार षटकारांसह इंगळे याने ३६ धावा केल्या नसत्या तर महाराष्ट्राला दोनशे धावसंख्या गाठता आली नसती. त्यांची ९ बाद १५६ अशी अवस्था झाली होती. इंगळने प्रदीप दाधे याच्यासह अखेरच्या विकेटसाठी केलेली ५२ धावांची भागीदारी महाराष्ट्राच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी ठरली.
महाराष्ट्राकडून पवन शहा (३५), केदार जाधव (२७) आणि धनराज शिंदे (३०) यांनी जम बसवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना मोठी खेळी करता आली नाही. विदर्भच्या यश ठाकूर, ललित यादव आणि आदित्य सरवटे यांनी भेदक मारा केला.
दुपारनंतर फलंदाजीस उपयुक्त वातावरण आणि खेळपट्टी झाल्यांतर विदर्भच्या ध्रुव शौरे आणि यश राठोड यांनी फायदा घेतला. त्यांनी केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे विदर्भने दिवसअखेर १ बाद १११ अशी मजल मारली.
संक्षिप्त धावफलक ः महाराष्ट्र ः २०८ (पवन शहा ३५, केदार जाधव २७, धनराज शिंदे ३०, मनोज इंगळे ३६, यश ठाकूर ६८-२, ललित यादव ३२-२, आदित्य सरवटे ४३-३). विदर्भ, पहिला डाव ः ध्रुव शौरे खेळत आहे ५५, यश राठोड खेळत आहे २९).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.