Ranji Trophy Final Madhya Pradesh Solid Batting In Day 3 Mumbai In Deep Trouble  esakal
क्रीडा

Ranji Trophy : मध्य प्रदेशची दमदार बॅटिंग; मुंबई मोठ्या अडचणीत

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू : रणजी ट्रॉफी फायनल सामन्यात मुंबई विरूद्ध खेळताना मध्य प्रदेशने तिसऱ्या दिवशी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यांनी तिसऱ्या दिवशी फक्त 3 फलंदाज गमावून 368 धावांपर्यंत मजल मारली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईवर पहिल्या डावात आघाडी मिळवण्यासाठी आता मध्य प्रदेशला फक्त 6 धावांची गरज आहे. मध्य प्रदेशकडून यश दुबे (133) आणि शुभम शर्मा (116) यांनी शतकी खेळी केली. (Ranji Trophy Final Madhya Pradesh Solid Batting In Day 3 Mumbai In Deep Trouble)

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सलामीवीर यश दुबेने शुभम शर्माला साथीला घेत दुसऱ्या विकेटसाठी 222 धावांची दमदार भागीदारी रचली. यशने 133 धावांची शतकी खेळी केली तर शुभम शर्माने देखील 116 धावा करत आपले शतक पूर्ण केले. दरम्यान, मोहित अवस्थीने ही जोडी फोडली. त्याने शुभमला बाद केले. मात्र त्यानंतर आलेला रजत पाटीदार आणि यशने भागिदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी मध्य प्रदेशला 300 च्या पार पोहचवले. रजतने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर शम्स मुल्लाणीने ही 72 धावांची भागीदारी यश दुबेला 133 धावांवर बाद केले.

दरम्यान, रजत पाटीदार आणि कर्णधार आदित्य श्रीवास्तव यांनी तिसऱ्या दिवसअखेर मध्य प्रदेशला 3 बाद 368 धावांपर्यंत पोहचवले. आता सामन्याच्या चौथ्या दिवशी मध्य प्रदेश मुंबईवर किती धावांची आघाडी घेतो हे पाहणे गरजेचे आहे. कारण जर सामन्याचा निकाल लागला नाही तर पहिल्या डावाच्या अधिक्यावरच यंदाच्या रणजी ट्रॉफी हंगामाचा विजेता ठरवला जाणार आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर आपल्या 42 व्या विजेतेपदाची स्वप्न पाहणाऱ्या मुंबईचा पाय खोलात आहे अस म्हणावं लागले.

कारण सामन्याचे आता दोनच दिवस शिल्लक असून अजून पहिला डावा खेळणाऱ्या मध्य प्रदेशचे 7 फलंदाज मुंबईला बाद करायचे आहेत. उद्या चौथ्या दिवशी मुंबईने पहिल्या सत्रात मध्य प्रदेशच्या झटपट विकेट घेतल्या तरच त्यांना सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करता येतील. मात्र मध्य प्रदेश ज्या पद्धतीने बॅटिंग करत आहे ते पाहता मुंबईसमोर कठिण आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT