अंबी (पुणे) : महाराष्ट्र - आसाम यांच्यामधील रणजी करंडकातील ब गटातील येथे पार पडलेली लढत अखेर अनिर्णित राहिली. केदार जाधवच्या २८३ धावांच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या डावात ३२० धावांची मोठी आघाडी मिळवली; पण आसामचा दुसरा डाव लवकर बाद करण्यात त्यांना अपयश आले.
रिषव दासच्या नाबाद ११४ धावांच्या खेळीमुळे आसामने दुसऱ्या डावात ६ बाद ३०९ धावा फटकावल्या. महाराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली. आसामने एक गुण मिळवला.
आसामला पहिल्या डावात २७४ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर महाराष्ट्राने पहिल्या डावात ९ बाद ५९४ धावा करून डाव घोषित केला. केदार जाधवने २८३ धावांची खेळी हे महाराष्ट्राच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. सिद्धेश वीरने १०६ धावांची खेळी करीत महाराष्ट्राच्या धावसंख्येत मोलाची भर घातली.
संक्षिप्त धावफलक ः आसाम - पहिला डाव सर्व बाद २७४ धावा आणि दुसरा डाव ६ बाद ३०९ धावा (कुणाल सायकिया ५२, राहुल हजारीका ३९, रिषव दास नाबाद ११४, सिद्धार्थ सारमाह ५३, सत्यजीत बच्छाव ३/१२८, सिद्धेश वीर ३/७९) अनिर्णित वि. महाराष्ट्र - पहिला डाव ९ बाद ५९४ धावा, डाव घोषित.
रिषव दासचे दमदार शतक
महाराष्ट्राला पहिल्या डावात ३२० धावांची आघाडी घेता आली. त्यामुळे लढतीच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राकडे विजयाची संधी होती. पण अखेरच्या दिवशी आसामने ६ बाद ३०९ धावा फटकावल्या. त्यामुळे ही लढत अनिर्णित राहिली.
रिषव दास याने २११ चेंडूंमध्ये १३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ११४ धावांची खेळी साकारली. सिद्धार्थ सारमाहने ५३ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सत्यजित बच्छाव व सिद्धेश वीर यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.