राशिदने ९ चेंडूत कुटल्या नाबाद २७ धावा
Vitality Blast 21: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी२० लीग स्पर्धेत पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ससेक्सने यॉर्कशायरला पराभूत केले. निर्धारीत २० षटकांमध्ये यॉर्कशायरने १७७ धावा केल्या होत्या. त्यास प्रत्युत्तर म्हणून ससेक्सने २ चेंडू राखून १७८ धावांचा टप्पा गाठला. या सामन्यात हिरो ठरला अफगाणिस्तानचा राशिद खान. राशिदने ससेक्स संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने ९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २७ धावा कुटल्या. त्यापैकी त्याचा एक षटकार खूपच चर्चेत आहे.
राशिद खान जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा त्यांच्या संघाला २१ चेंडूत ४३ धावांची आवश्यकता होती. राशिदने मैदानावर येताच तुफान फटकेबाजीला सुरूवात केली. त्याने ९ चेंडूंचा सामना केला पण त्यात त्याने ५ चेंडू सीमारेषेपार पोहोचवले. त्यातही राशिदने एक षटकार असा खेचला की साऱ्यांना धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची आठवण झाली. राशिदने पुढे येऊन वेगवान गोलंदाजाला सरळ रेषेत उत्तुंग असा हेलिकॉप्टर सिक्स मारला. त्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.
दरम्यान, राशिद ससेक्ससाठी तारणाहार ठरल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. राशिदने फलंदाजीत कमाल केलीच. पण गोलंदाजीतही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ४ षटकात केवळ २५ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. या स्पर्धेची सेमीफायनल आणि फायनल १८ सप्टेंबरला रंगणार आहे. पण त्यावेळी राशिद खान त्यांच्या संघात नसेल, कारण राशिद काही दिवसात IPL 2021 साठी युएईला येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.