Ravi Shastri Big Statement  esakal
क्रीडा

Ravi Shastri : शास्त्रींचा मोठा दावा! ऑस्ट्रेलियातील T20 World Cup नंतर टीम इंडियात मोठे बदल

अनिरुद्ध संकपाळ

Ravi Shastri Big Statement About Team India : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाबाबत एक मोठा दावा केला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी 20 वर्ल्डकपच्या निष्कर्षानंतर भारतीय संघात मोठे बदल होतील एक नवाच संघ आपल्याला पहायला मिळेल असा दावा केला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपमधील भारतीय संघात आणि 2022 मधील टी 20 वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात अनेक नवे चेहरे दिसत आहे. यात दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांचा समावेश आहे.

दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताच्या वर्ल्डकप संघाबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, 'मी या व्यवस्थेचा गेली सहा ते सात वर्षे भाग राहिलो आहे. पहिल्यांदा मी संघाचा प्रशिक्षक होतो. आता मी बाहेरून संघाचे निरिक्षण करतोय. माझ्या मते भारताचा आताचा टी 20 क्रिकेटमधील संघ हा सर्वोत्कृष्ट संघ आहे. मला असेही वाटते की या वर्ल्डकपनंतर एक नवा भारतीय संघ आपल्याला पहायला मिळेल.'

शास्त्री पुढे म्हणाला की, 'सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय, हार्दिक 5 व्या आणि पंत किंवा दिनशे कार्तिक 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय. यामुळे संघात मोठा फरक पडला आहे. यामुळे टॉप ऑर्डरला मुक्तपणे खेळण्याची सधी मिळते. आता टॉप ऑर्डर त्याच पद्धतीने खेळत आहे.'

भारतीय संघाची स्तुती करणाऱ्या रवी शास्त्रींनी संघात काही सुधारणाही होणे गरजेचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'एका क्षेत्रात भारताने सुधारणा करण्याची गरज आहे ते म्हणजे क्षेत्ररक्षण. त्यांना पहिल्यापासून आपल्या क्षेत्ररक्षणावर काम करावे लागेल.'

ते पुढे म्हणाले की, 'त्यांना मैदानावर क्षेत्ररक्षणात आपले सर्वोत्तम देण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात जर त्यांनी 15 ते 20 धावा वाचवल्या तर त्याचा खूप मोठा फरक सामन्याच्या निकालावर पडू शकतो. कारण प्रत्येकवेळी तुम्ही फलंदाजी करता त्यावेळी तुम्हाला 15 ते 20 धावा जास्तच कराव्या लागतात. आशिया कपमध्ये श्रीलंकेने तेच केले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका देखील जबरदस्त क्षेत्ररक्षण करतात.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

SCROLL FOR NEXT