Ravi Shastri Praise Sanju Samson Ahead Of Shreyas Iyer For T20 World Cup In Australia esakal
क्रीडा

श्रेयस अय्यरपेक्षा 'या' खेळाडूकडे फटक्यांची वैविध्यता : शास्त्री

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरूद्धची टी 20 मालिका आजपासून दिल्लीत सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले नाही. त्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात संघाला फायनलपर्यंत मजल मारून दिली होती. त्याने गेल्या श्रीलंका दौऱ्यात देखील दोन सामन्यात 154 च्या सरासरीने 57 धावा केल्या होत्या. (Ravi Shastri Praise Sanju Samson Ahead Of Shreyas Iyer For T20 World Cup In Australia)

दरम्यान, 2020 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात संजू सॅमसनचा देखील समावेश होता. त्यावेळी रवी शास्त्री हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. रवी शास्त्री त्यावेळी संजू सॅमसनकडे असलेल्या फटक्यांच्या वैविध्यतेवर जाम खूष झाले होते. संजू शॉर्ट बॉल खेळण्यात माहिर आहे. यंदाचा टी 20 वर्ल्डकप हा ऑस्ट्रेलियात होणार आहे.

याच संदर्भात इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'राहुल त्रिपाठी, संजू सॅमनस आणि श्रेयस अय्यर यांच्यात संघात येण्यासाठी चुरस आहे. मात्र जर तुम्ही ऑस्ट्रेलियाचा विचार कराल तर तेथे चेंडूला उसळी आणि गती असते त्यामुळे तुम्हाला पूल आणि कट शॉट खेळणे गरजेचे आहे. अशा वेळी संजू सॅमसन कायम धोकादायक ठरू शकतो.'

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, तेथील परिस्थितीत संजू सॅमसनकडे भारतीय संघातील इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त फटक्यांची वैविध्यता आहे. ऑस्ट्रेलियात चेंडू फार स्विंग होत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अशा परिस्थिती संजूच्या भात्यात इतरांच्या तुलनेत अनेक फटके आहेत.

सध्या भारतीय संघात तीन विकेटकिपर आहेत. ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करत आहे. याचबरोबर इशान किशन आणि दिनेश कार्तिक हे देखील दोन विकेटकिपर प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळतात. केएल राहुल देखील विकेट किपिंग करायचा त्यामुळे संघात आधीच चार चार विकेटकिपर असल्यामुळे बहुदा संजू सॅमसनला संधी मिळाली नसावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT