भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) संध्या लेजंड क्रिकेट लीग स्पर्धेसाठी मस्कतमध्ये आहेत. तेथून ते भारतीय क्रिकेट वर्तुळात घडणाऱ्या, घडलेल्या घटनांवर आपले विशेष टिप्पणी करत आहे. दरम्यान, त्यांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनलसाठी (Shoaib Akhtar You Tube Channel) एक मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी भारताच्या आजी माजी आणि भविष्यातील कर्णधारांबद्दल आपले मत व्यक्त केले. (Ravi Shastri Says Rohit Sharma is Like MS Dhoni)
रवी शास्त्री यांनी शोएब अख्तरशी बोलताना सांगितले की, ' विराट कोहली (Virat Kohli) क्रिकेटच्या मैदानावर एक रानटी प्राण्यासारखा असतो. तो मैदानावर प्रचंड स्पर्धात्मक असतो. मात्र एकदा का तो मैदानाच्या बाहेर आला की तो शांत आणि चिल असतो. रोहित शर्मा (Rohit Sharma) हा एमएस धोनी (MS Dhoni) सारखा आहे. पण, एमएस हा एक स्वप्नवत आहे. त्याच्यासारखा तोच! शून्यावर बाद होऊ दे, शतक ठोकू दे, वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावू दे, त्याच्यात कोणताही बदल होत नाही.'(Ravi Shastri on MS Dhoni)
शास्त्री पुढे म्हणतात, 'मी अनेक खेळाडू पाहिले मात्र धोनीसारखा नाही पाहिला. सचिनकडे (Sachin Tendulkar) जबदस्त प्रतिभा होती मत्र को कधी कधी चिडायचा देखील. मात्र धोनी कधीच नाही. अजही माझ्याकडे त्याचा फोन नंबर नाही. मी कधी त्याला विचारला पण नाही. मला माहिती आहे की तो आपल्या सोबत फोन ठेवत नाही.'
रवी शास्त्री यांनी विराट कोहलीने नेतृत्व सोडल्यानंतर त्याला एक सल्ला देखील दिलायं. त्यांनी त्याच्या या निर्णयावर आश्चर्य वाटले असेही सांगितले. पण, ते त्याच्या निर्णयाचा आदर करतात. रवी शास्त्री म्हणाले की, 'एक दीर्घ काळ एखादा व्यक्ती चांगली कामगिरी करतो. त्यावेळी काही लोक त्या व्यक्तीवर प्रेम करतात काही लोक त्याचा हेवा करतात. लोक जळत देखील असतात. हा मानवी गुणधर्म आहे. पण, हा वाईट गुणधर्म आहे. जे लोक संधीची वाट पाहत असतात त्यांच्यावर दबाव निर्माण होऊ लागतो. विराट कोहलीवर (Virat Kohli) देखील प्रचंड दबाव होता. कोरोना काळात तीन फॉरमॅट, तुम्हाला ब्रेक घेण्याची संधी देखील मिळत नाही. मला असे वाटते की त्याने मर्यादित क्रिकेटसाठी योग्य निर्णय घेताला. मात्र कसोटी कॅप्टन्सी सोडणे आश्चर्यकारक होते. पण, शेवटी मी त्याच्या निर्णयाचा आदर करतो.'
विराट कोहलीला शास्त्रींचा सल्ला
विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेमधून ब्रेक घेणार असल्याचे अफवा पसरली होती. मात्र त्याने मालिका खेळली. मात्र रवी शास्त्रींना वाटते की विराट कोहलीने आता थोडा ब्रेक घ्यावा त्याचा त्याला फायदा होईल. या संक्रमणाच्या काळात त्याला पुढच्या आव्हानांसाठी सज्ज होता येईल.
शास्त्री या बाबत म्हणाले की, 'मला वाटते की तो आता ३३ वर्षाचा झालायं हे त्याला कळून चुकले आहे. तो अजून पाच वर्षे तरी चांगलं क्रिकेट खेळू शकतो. त्याने २ ते ३ महिन्यांचा ब्रेक घेणे किंवा एखाद्या मालिकेतून ब्रेक घेण्यानेही त्याला फायदा होईल. मानसिकदृष्ट्या तो अजून सक्षम होईल. त्याला आपला संघातील रोल काय आहे याची जाणीव होईल. मग तो संघातील एक खेळाडू म्हणून खेळण्यास सज्ज होईल. मी कोहलीकडून याचीच अपेक्षा करत आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.