Ravichandran Ashwin  Twitter
क्रीडा

WTC Final मधील 5 मोठे विक्रम; अश्विनसह चौघांची हवा

अश्विनने ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले. 14 सामन्यात अश्विनने 71 विकेट घेतल्या. पॅट कमिन्सने एवढ्याच सामन्यात 70 विकेट घेतल्या आहेत.

सुशांत जाधव

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या-वहिल्या स्पर्धेत टीम इंडियाच्या पदरी निराशा आली. न्यूझीलंडच्या संघाने फायनलमध्ये 8 विकेट्सनी बाजी मारत टेस्टमध्ये बेस्ट असल्याचे दाखवून दिले. टीम इंडियाला फायनल जिंकता आली नसली तरी फिरकीपटू अश्विन गोलंदाजीत चॅम्पियन ठरलाय. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. (R Ashwin most wicket in wtc) अश्विनने ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले. 14 सामन्यात अश्विनने 71 विकेट घेतल्या. पॅट कमिन्सने एवढ्याच सामन्यात 70 विकेट घेतल्या आहेत.

सर्वाधिक धावांची बरसात करणारा लाबुशेन

ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन (Maruns Labuschagne) सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला. 23 डावात 72 च्या सरासरीने लाबुशेन याने 1675 धावा केल्या आहेत. या विक्रमी खेळीत 5 शतक आणि 9 अर्धशतकांचा सामावेश आहे.

कायले जेमिन्सनचाचा पाचचा पंच!

​वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत न्यूझीलंडचा नवोदित जलगती गोलंदाज कायले जेमिन्सिन यांनी सर्वात प्रभावित केले. (Kyle Jamieson most five wicket haul in wtc) या स्पर्धेत सर्वाधिक वेळा 5 विकेट घेण्याचा पराक्रम त्याने करुन दाखवला. साउदम्टनच्या मैदानात टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला होता. 2020 मध्ये कसोटी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या जेमिन्सनने 8 कसोटी सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत. यात पाच वेळा त्याने पाक विकेट घेण्याचा पराक्रम केलाय.

इंग्लंडच्या कर्णधाराने घेतले सर्वाधिक कॅच

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम हा इंग्लंडचा कर्णधार जो रुट (Joe Root) याच्या नावे झालाय. 20 सामन्यात त्याने 34 कॅच पकडले. हा खास विक्रम करताना एका मॅचमध्ये त्याने सर्वाधिक 3 कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले.

​बेन स्टोक्स ठरला षटकार किंग!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम हा इंग्लंडचा धमाकेदार फलंदाज बेन स्टोक्सच्या नावे आहे. अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes most sixes in wtc) 17 कसोटी सामन्यात 31 षटकार मारले.

लाबुशेन शतकांचा बादशहा!

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत (ICC World Test Championship) सर्वाधिक शतकांचा विक्रम हा लाबुशेनच्या नावे आहे. त्याने 23 डावात सर्वाधिक 5 शतके झळकावली आहेत. त्याच्या पाठोपाठ या यादीत स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, रोहित शर्मा, बाबर आजम आणि दिमुथ करुणारत्नेचा नंबर लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : या निवडणुकीत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढतोय : संजय राऊत

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT