ravichandran ashwin praises bumrah Match winning bowling in test visakhapatnam Sakal
क्रीडा

रविचंद्रन अश्‍विनकडून बुमराचे कौतुक; विशाखापट्टणमधील कसोटीत सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी

पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यामुळे दबावाखाली असलेल्या यजमान भारतीय क्रिकेट संघाला जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यामुळे विशाखापट्टण येथील दुसऱ्या कसोटीत विजयाच्या रूपात नवसंजीवनी मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यामुळे दबावाखाली असलेल्या यजमान भारतीय क्रिकेट संघाला जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यामुळे विशाखापट्टण येथील दुसऱ्या कसोटीत विजयाच्या रूपात नवसंजीवनी मिळाली. या कसोटीत नऊ विकेट मिळवणारा बुमरा सामन्याचा मानकरी ठरला.

याच पार्श्वभूमीवर भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विन याने यूट्युबवरील चॅनेलवर बुमराच्या गोलंदाजीचे कौतुक केले. आयसीसीच्या तिन्ही प्रकारांत पहिल्या स्थानावर पोहोचणाऱ्या बुमराने विशाखापट्टणमधील कसोटीत सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी केली, अशा शब्दांत अश्‍विनने स्तुती केली.

अश्‍विन पुढे म्हणाला, बुमरा याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक १४ फलंदाज बाद केले आहेत. तो कसोटी क्रिकेटमधील नंबर वन गोलंदाजही बनला आहे. त्याने केलेली कामगिरी हिमालया एवढी उत्तुंग आहे. त्याचा मी चाहता झालो आहे.

भारत - इंग्लंड यांच्यामधील पाच कसोटी सामने हैदराबाद, विशाखापट्टण, राजकोट, रांची व धर्मशाळा येथे होत आहेत. याबाबत अश्‍विन म्हणाला, अशा ठिकाणी कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आमच्या संघातील बहुतांशी क्रिकेटपटूंकडे नाही. त्यांच्यासाठी हे नवीनच ठिकाण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: विराटवर शरीरवेधी मारा करा... कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी विकेटकिपर नक्की काय म्हणाला?

मतदानासाठी शेवटचे १५ मिनिटे शिल्लक! सोलापूर जिल्ह्यात ५७.०९ टक्के मतदान; दक्षिण सोलापूर, शहर मध्य व शहर उत्तर या ३ मतदारसंघात सर्वात कमी मतदान

Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान वादात ICC चं मरण, कायदेशीर कारवाईची टांगती तलवार; जाणून घ्या नेमकं कारण

Maharashtra Election: राज्यभरात मतदान केंद्रांची तोडफोड, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; जाणून घ्या कुठे काय घडलं?

Wardha Vidhan Sabha Voting: वर्ध्यात निलेश कराळे मास्तरांना मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT