Ravichandran Ashwin  esakal
क्रीडा

Ravichandran Ashwin : मी खूप आधीच ठरवलं होतं... वर्ल्डकप संघातील समावेशाबाबत अश्विननं केलं मोठं विधान

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin : भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी संघाचा अविभाज्य घटक आहे. मात्र भारताकडून 712 विकेट्स घेणारा अश्विन वर्ल्डकप 2023 च्या भारतीय संघात असेल याची शाश्वती नाही.

कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी आपले वनडे संघातील स्थान पक्के केले आहे. मात्र निवडसमिती अश्विनच्या नावाची चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र तरी देखील त्याला संघात स्थान मिळेल याची शक्यता फार कमी आहे. (ODI World Cup 2023 Team India Squad)

रविचंद्रन अश्विनने शेवटचा वनडे सामना हा जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. तेव्हापासून अश्विन हा भारताच्या वनडे संघाचा भाग नाहीये. मात्र तरी देखील अश्विन 2023 वनडे वर्ल्डकपच्या संघात निवड होईल यासाठी प्रचंड आशावादी आहे.

रविचंद्रन अश्विन टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'संघाची निवड करणे हा माझा जॉब नाही. मी खूप आधीच ठरवलं होतं की ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्या गोष्टींचा विचार करायचा नाही. तरी देखील माझी 2023 चा वर्ल्डकप खेळण्याची जबरदस्त इच्छा आहे.'

'मी खरं सांगू का माझी क्रिकेट कारकीर्द आणि आयुष संध्या चांगल्या स्पेसमध्ये आहे. मी नकारात्मक गोष्टी माझ्या विचार प्रक्रियेपासून दूर ठेवत आहे.'

भारतीय वनडे संघातून 2017 मध्ये देखील अश्विनला डच्चू देण्यात आला होता. मात्र त्याने पाच वर्षानंतर 2021 - 20 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आश्चर्यकारक पुनरागमन केलं होते. मात्र त्याला आपली छाप पाडता आली नाही. दोन सामन्यात त्याला फक्त 1 विकेट घेतला आळी. त्याची इकॉनॉमी ही 6.05 इतकी होती.

भारतीय खेळपट्ट्यांवर रविचंद्रन अश्विनसारखा गोलंदाज किती उपयुक्त ठरू शकतो हे सांगायला कोण्या जाणकाराची गरज नाही. भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये 8 सामने हे फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळणार आहे. या खेळपट्ट्यांवर अश्विन चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र संघ व्यवस्थापन ऑफ स्पिनरऐवजी रिस्ट स्पिनरला पसंती देत आहे.

रविचंद्रन अश्विन हा भारताने 2011 मध्ये जिंकलेल्या वनडे वर्ल्डकपचा भाग होता. या वर्ल्डकपमध्ये हरभजन सिंग जास्तीजास्त सामने खेळला होता. आशिया कप 2023 साठीचा भारतीय संघ या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवडसमिती सर्व खेळाडूंच्या नावांची चर्चा करेल. मात्र अश्विनला त्याची निवड होण्याची शक्यता फार कमी असल्याचेही दिसते.

अश्विन म्हणाला की, 'मी वर्तमानात जगणारा व्यक्ती आहे. मी कोणतंही काम मागं टाकलेलं नाीह. मात्र हे खरं आहे की भारतीय संघाने पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकावा अशी माझी इच्छा आहे. जरी मी संघात नसलो तरी.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT