Jadeja-Dhoni File Photo
क्रीडा

धोनीच्या सल्ल्यामुळं बदललं करिअर; जडेजानं केला खुलासा

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. सध्या जडेजा आणि टीम इंडिया विलगीकरणात आहेत.

वृत्तसंस्था

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. सध्या जडेजा आणि टीम इंडिया विलगीकरणात आहेत.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या जगातील सर्वात लोकप्रिय अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीतही कमाल करत जडेजाने धमाल उडवून दिली आहे. तसेच त्याचे क्षेत्ररक्षणही जबरदस्त आहे. गेल्या काही वर्षात जडेजाच्या खेळामध्ये चांगलाच बदल झाल्याचे दिसून आले. क्रिकेटच्या सर्व प्रकारात टीम इंडियाचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज तो बनला आहे. जडेजाचं करिअर कसं बदललं, यामागील गुपित आता त्याने स्वत:च लगडलं आहे. (Ravindra Jadeja reveals MS Dhoni advice changed his cricket career)

रविंद्र जडेजाने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, २०१५च्या विश्व करंडक स्पर्धेदरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मला एक सल्ला दिला. धोनी मला म्हणाला की, मी मारू नये, असा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न करत आहे. मलाही शॉट सिलेक्शन चुकत असल्याचं जाणवलं. सुरुवातीला माझा निर्णय योग्य नव्हता. मी डबल माइंडमध्ये राहायचो. मी हा शॉट खेळला पाहिजे की नाही? याचाच विचार करत राहायचो.

तो पुढे म्हणाला, 'पण आता चेंडू टोलवण्याबाबत माझ्या मनात स्पष्टता असते. मी वेळ घेतो, आणि पुन्हा खेळयला सुरवात करतो. मला माहित आहे की, मी खेळपट्टीवर टिकून राहिलो, तर मी नंतर धावा काढू शकतो. विचारात बदल केल्याने खूप मदत झाली. जडेजा बाउन्सरविषयी म्हणाला की, जेव्हा तुम्ही शॉर्ट चेंडूवर षटकार मारता तेव्हा आत्मविश्वास वाढतो. बाउन्सरविरोधात मला कधीच अडचण आली नाही. मी कधी बाउन्सरवर आउट झालो, असं मला आठवत नाही.

इंग्लंड दौरा

विशेष म्हणजे, आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी रविंद्र जडेजा इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. सध्या जडेजा आणि टीम इंडिया विलगीकरणात आहेत. १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

क्रीडा विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT