Ravindra Jadeja  ESAKAL
क्रीडा

Ravindra Jadeja : सीएसकेच्या स्टारनं कांगारूंना 'होम ग्राऊंड'वर केलं गार; पॅट कमिन्सचा निर्णय आला अंगलट

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Australia : भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या तोंडचं पाणी पळवलं. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सीएसकेचा स्टार रविंद्र जडेजाने कांगारूंच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली.

भारताने ऑस्ट्रेलियाला 199 धावात रोखले. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने 46 तर डेव्हिड वॉर्नरने 41 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत चेन्नईच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तीन फिरकी गोलंदाजांनिशी मैदानावर उतरला. खेळपट्टी तरी संथ असली तरी सायंकाळी दव पडले तर ती फलंदाजीला पोषक होण्याची शक्यता आहे.

कोरड्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या भारतीय गोलंदाजांनी पहिल्यापासूनच आक्रमक ऑस्ट्रेलियाला वेसन घातले. सलामीवीर मिचेल मार्श शुन्यावर बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी 69 धावांची भागीदारी रचली. मात्र कांगारूंची ही भागीदारी फारच संथ होती.

त्यामुळे धावांची गती वाढवण्याचा नादात डेव्हिड वॉर्नर 41 धावांवर बाद झाला. त्याचा अडसर कुलदीप यादवने दूर केला. यानंतर स्मिथ आणि लाबूशने यांनी कांगारूंना शंभरी पार करून दिली मात्र तोपर्यंत 25 षटके पूर्ण झाली होती.

यानंतर रविंद्र जडेजाने आपली फिरकीची जादू दाखवत कांगारूंची मधली फळी उडवली. त्याने स्मिथ, मार्नस आणि कॅरीला चालते केले. कांगारूंची अवस्था 2 बाद 110 धावांवरून 5 बाद 119 धावा अशी केली. यानंतर मॅक्सवेलने 15 धावांचे योगदान देत ऑस्ट्रेलियाला 140 धावांपर्यंत पोहचवले.

मात्र कुलदीप यादवने त्याचीही शिकार करत कांगारूंना मोठा धक्का दिला. यानंतर अश्विनने ग्रीनची 8 धावांवर विकेट घेतली. तळातील फलंदाज पॅट कमिन्सने 15 तर मिचेल स्टार्कने 28 धावावांचे योगदान देत कांगारूंना 199 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT