Samarth Salunkhe sakal
क्रीडा

Skating Record : सलग ७५ तास स्‍केटिंगची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

​मुकुंद भट

ओगलेवाडी - बेळगाव येथे शिवगंगा स्टेडियममध्ये सलग ७५ तास व रिव्हर्स शंभर मीटर स्केटिंग करून कऱ्हाडच्या ईगल स्केटिंग अॅण्ड रोल बॉल अॅकॅडमीचा राष्ट्रीय खेळाडू समर्थ रमेश साळुंखे (रा. सैदापूर, ता. कऱ्हाड) याच्‍यासह परिसरातील सुजल माळवदे, शर्वरी यादव, शिवांश बाबर, सईशा चव्हाण व अभंग तांबे या सहा खेळाडूंनी विक्रम करून राज्य व देशाचा नावलौकिक वाढवला.

नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत चौदा वर्षांखालील गटात समर्थ साळुंखेसह इतर सहा खेळाडूंची निवड झाली आहे. त्याबद्दल यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या खेळाडूंनी गेल्या वर्षी सलग ४८ तास स्केटिंग करून अकरा सेकंदात शंभर मीटर स्केटिंगचा विक्रम केला होता, तर त्यांनी नुकताच ७५ तास स्केटिंगमध्ये १४.८४ सेकंदात शंभर मीटर रिव्हर्स स्केटिंगचा उच्चांक करून गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करून सलग दोन वर्षे सन्मानाचे प्रशस्तिपत्रक मिळवले.

समर्थ साळुंखेने गोवा व दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. त्याने क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यास रत्नागिरी येथे क्रीडा विकास परिषदेतर्फे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत देशपातळीवर हिंदरत्न किताब पटकावला, तसेच फोनिक्स राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.

स्केटिंग प्रशिक्षक अझर मुल्ला, राष्ट्रीय प्रशिक्षिका बुशारा मुल्ला यांचे समर्थला मार्गदर्शन लाभले आहे. ईगल स्केटिंग अॅकॅडमीचे संस्थापक सलीम मुल्ला, डॉ. परेश पाटील, सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या जयमाला शिर्के, ग्रामस्थ आदींनी समर्थ साळुंखेचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रयत इंग्लिश मीडियम स्कूलचा तो विद्यार्थी आहे. त्यांचे सुमारे साठ जणांचे एकत्रित कुटुंब म्हणून ओळख आहे.

नेपाळला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी माझी निवड झाली आहे. त्या स्पर्धेसाठी माझा सराव व तयारी आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून राज्याच्या व देशाच्या नावलौकिकात भर घालण्याच्या माझा निर्धार आहे, तसेच दै. ‘सकाळ’च्या सहकार्याबद्दल धन्यवाद.

- समर्थ साळुंखे, राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू, सैदापूर (ता. कऱ्हाड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT