क्रीडा

Ind vs Aus Final : रिकी पाँटिंगच्या स्प्रिंगच्या बॅटने भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले? जाणून घ्या सत्य

Kiran Mahanavar

Ind vs Aus Final : भारतीय क्रिकेटमध्ये 2003 साल कोणीही विसरू शकत नाही. या वर्षी भारताला अशी जखम झाली ज्याच्या वेदना आजही भारतीय चाहत्यांच्या हृदयाला टोचतात. जोहान्सबर्ग येथे झालेल्या वर्ल्ड कप 2003 च्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगच्या शतकाने भारताचे विश्वविजेते होण्याचे स्वप्नही भंगले होते. या फायनलनंतर काही दिवसांनी पाँटिंगच्या बॅटबद्दल खुप चर्चा झाली. भारताविरुद्ध अंतिम सामन्यात पॉन्टिंगने ज्या बॅटने शतक झळकावले होते त्या बॅटमध्ये स्प्रिंग होती, अश्या बातम्या त्यावेळेस माध्यमांमध्ये आल्या होत्या. पण काय आहे त्यामागील सत्य हे जाणून घेऊया....

पण त्याआधी आपण त्या सामन्यामध्ये काय झाले पाहू... त्या सामन्यात पाँटिंगने 121 चेंडूत चार चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 140 धावांची नाबाद खेळी केली. पाँटिंगचा स्ट्राईक रेट 115.70 होता. त्याच्याशिवाय डॅमियन मार्टिनने या सामन्यात 84 चेंडूत 88 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीत सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

अॅडम गिलख्रिस्टने 48 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 57 धावा केल्या होत्या. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत दोन गडी गमावून 359 धावा केल्या. टीम इंडिया 39.2 ओव्हरमध्ये 234 रन्सवर ऑलआऊट झाली.

पाँटिंगच्या बॅटमध्ये खरच स्प्रिंग होती का?

वर्ल्ड कप 2003 चा अंतिम सामना 23 मार्च रोजी खेळला गेला ज्यात भारताचा 125 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर आठ दिवसांनी भारतातील एका वृत्तपत्रात बातमी छापून आली होती की, पॉन्टिंगने ज्या बॅटने टीम इंडियाच्या गोलंदाजांना फायनलमध्ये पराभूत केले होते त्या बॅटला स्प्रिंग होती.

त्याच बातमीत हा अंतिम सामना दोनदा होणार असल्याचे सांगण्यात आले. हे वाचून चाहत्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही. पण बातमीच्या शेवटी एका ओळीने हा सगळा आनंद लुटला. बातमीच्या शेवटी लिहिले होते की, एप्रिल फूल केले आहे.

हे वृत्त 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाले होते. म्हणजे पाँटिंगच्या बॅटला स्प्रिंग असल्याच्या बातमीत तथ्य नव्हते. अर्थात, या बातमीचे सत्य तेव्हाच समोर आले, पण पाँटिंगच्या बॅटला स्प्रिंग आहे की काय, अशी चर्चा वर्षानुवर्षे सुरू होती. आजही 2003 च्या वर्ल्ड कपबद्दल बोललं जातं तेव्हा हा विषयही कुठूनतरी समोर येतो.

अविस्मरणीय खेळी

पाँटिंगच्या या खेळीने भारतीय चाहत्यांना आणि खेळाडूंना खोलवर जखमा दिल्या. पाँटिंगने कर्णधार म्हणून जे करायला हवे होते ते केले. पाँटिंगची ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय खेळी तर होतीच पण ती एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळींमध्येही गणली जाते.

जवागल श्रीनाथ, झहीर खान आणि आशिष नेहरा या भारताच्या वेगवान गोलंदाजी त्रिकुटाने त्या वर्ल्ड कपमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली होती, पण अंतिम फेरीत तिघेही काही करू शकले नाहीत. तिघांनीही भरपूर धावा दिल्या होत्या.

कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या आठ गोलंदाजांचा वापर केला. पण पाँटिंगला कोणीही रोखू शकले नाही. त्यावेळी अंतिम सामन्यात कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना..! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब

Nagpur South Assembly Election 2024 Result: प्रतिष्ठेची लढत भाजपने जिंकली, नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे मोहन मते यांचा विजय

Sports Bulletin 23rd November: पर्थ कसोटीत भारताकडे भक्कम आघाडी ते उद्या आयपीएल २०२५ चा मेगा ऑक्शन रंगणार

Rohit Pawar Won Karjat-Jamkhed Assembly Election 2024 Result Live: रोहित पवारांचा अटीतटीचा विजय; राम शिंदेंना दुसऱ्यांदा दिली मात

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT