Pakistan Cricket News : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे आशिया कपमधील आव्हान सुपर 4 फेरीतच संपुष्टात आले. भारतासोबत ड्रीम फायनल खेळण्याचे त्यांचे स्वप्न श्रीलंकेमुळे भंगले. याचबरोबर वर्ल्डकपच्या तोंडावरच त्यांचे दोन अव्वल गोलंदाज हारिस रऊफ आणि नसीम शाह हे देखील दुखापतग्रस्त झाले.
या सर्व घडामोडीदरम्यान, पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये वादाचे प्रसंग देखील उद्भवल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये वाद झाला आहे.
पाकिस्तान हा आशिया कपमध्ये फेव्हरेट संघ म्हणून गणला जात होता. सर्वजण भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल होणार अशी चर्चा करत होते. मात्र सुपर 4 मध्ये पाकिस्तान आधी भारतकडून मोठ्या फरकाने पराभूत झाला. त्यानंतर अटीतटीच्या सामन्यात गतविजेत्या श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करत त्यांचे फायनल खेळण्याचे मनसुबे उधळून लावले.
दरम्यान, पाकिस्तानातील बोल न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार कर्णधार बाबर आझमने ड्रेसिंग रूममध्ये सर्वांची कडक शब्दात कानउघडणी केली. तुम्ही आता खूप मोठे स्टार खेळाडू झाला आहात तुमच्या दृष्टीने कामगिरी करणं महत्वाचं नाही असे बाबर आझम बोलला.
बाबर पुढे म्हणाला की, जर तुम्ही अशीच कामगिरी करत राहिला तर तुम्हाला लोकं लवकरच विसरून जातील. वर्ल्डकप ही तुमची शेवटची संधी असेल.
मात्र बाबर आझमचे ही कानउघडणी शाहीनला काही रूचली नाही. त्याने बाबरला ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे त्यांचे तरी कौतुक कर असं सुनवलं. मात्र बाबरला शाहीनची ही लुडबूड आवडली नाही. तो शाहीनला म्हणाला की, मला माहिती आहे की कोण चांगली कामगिरी करतंय कोण नाही.
या सर्व शाब्दिक चकमकीत मोहम्मद रिझवान आणि सपोर्ट स्टाफने मध्यस्थी केली आणि प्रकरण वाढू दिले नाही. पाकिस्तानी संघ ज्यावेळी हॉटेलमध्ये परतला त्यावेळी बाबर आझम अपसेट दिसत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.