T20 World Cup Rilee Rossouw sakal
क्रीडा

T20 World Cup : Rilee Rossouw ऐतिहासिक शतक, ठोकल्या 15 चेंडूत 76 धावा

बांगलादेशविरुद्ध सिडनी येथे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रिले रोसोने झंझावाती शतक झळकावून रचला इतिहास

Kiran Mahanavar

Rilee Rossouw T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्ध हातातोंडाशी आलेला विजय पावसामुळे हिरावल्या गेल्याने दक्षिण आफ्रिकेला सलामी सामन्यात केवळ एका गुणांवर समाधान मानावे लागले. आजच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध सिडनी येथे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रिले रोसोने झंझावाती शतक झळकावून इतिहास रचला आहे. 194.64 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना रुसोने 56 चेंडूत 109 धावा केल्या. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले, म्हणजेच त्याने 15 चेंडूत केवळ चौकार आणि षटकारांसह 76 धावा केल्या. या शतकादरम्यान रुसोने अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले आहे.

सलग दोन टी-20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा रुसो दक्षिण आफ्रिका देशांचा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी त्याने इंदूरमध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात 48 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वे विरुद्धच्या सुपर 12 फेरीतील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला, ज्यामध्ये रौसो फलंदाजीसाठी आला नाही. रिले रोसोने आतापर्यंत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने158.43 च्या स्ट्राइक रेटने 667 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आपली पहिली विकेट लवकर गमावली पण त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि रिले रोसो यांनी बंगाली गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोन्ही फलंदाजांनी 81 चेंडूत 168 धावांची भागीदारी केली. क्विंटन डी कॉकने 38 चेंडूत 63 धावा बाद केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरातील तपोवन मैदानावर योगी आदित्यनाथांची आज जाहीर सभा

Winter Soup Recipe: हिवाळ्यात सकाळी नाश्त्यात प्या गरमागरम गाजर सूप! शरीर राहील उबदार, लगेच लिहा रेसिपी

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT