Rinku Singh esakal
क्रीडा

Team India : रिंकू सिंगला अचानक आनंदाची बातमी, BCCI ने वनडे संघात केला समावेश

आयपीएल सामन्यात डावाच्या शेवटच्या षटकात सलग 5 षटकार ठोकणाऱ्या या धडाकेबाज फलंदाजाचा वनडे संघात समावेश

Kiran Mahanavar

Rinku Singh Team Selection : इंडियन प्रीमियर लीगच्या गेल्या मोसमात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या युवा फलंदाज रिंकू सिंगला बीसीसीआयने मोठे बक्षीस दिले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा हा धडाकेबाज फलंदाज एका आयपीएल सामन्यात डावाच्या शेवटच्या षटकात सलग 5 षटकार ठोकून रातोरात स्टार बनला. या सामन्यात संघाला विजयही मिळवून दिला. आता त्याचा बीसीसीआयने एकदिवसीय संघात समावेश केला आहे.

विंडीज मालिकेत नाही मिळाली संधी!

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेसाठी रिंकूला कोणत्याही फॉरमॅटसाठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. याबद्दल चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली. त्यांच्यापेक्षा यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना पसंती मिळाली. आता रिंकू सिंग लवकरच बॅटने मैदानात धुमाकूळ घालताना दिसणार आहे.

बीसीसीआयने रिंकू सिंगला मोठे बक्षीस दिले आहे. देवधर ट्रॉफी-2023 या देशांतर्गत वनडे स्पर्धेसाठी त्याला सेंट्रल झोन संघात स्थान देण्यात आले आहे. या संघाचे कर्णधारपद स्टार फलंदाज व्यंकटेश अय्यर सांभाळणार आहे. व्यंकटेश केकेआरचेही प्रतिनिधित्व करतो.

टीम इंडियात शकते मिळू संधी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी रिंकू संघात नसला तरी तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकेल अशी आशा आहे. रिंकू सिंगला 18 ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी संधी मिळू शकते.

मात्र, देवधर करंडक स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवरही ते अवलंबून असेल. रिंकू सिंगशिवाय मुंबई इंडियन्सकडून खेळलेले शिवम मावी, मोहसीन खान आणि आकाश मधवाल यांनाही संधी मिळाली आहे.

देवधर करंडक स्पर्धेसाठी सेंट्रल झोन संघ : माधव कौशिक, शिवम चौधरी, यश दुबे, यश कोठारी, व्यंकटेश अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आर्यन जुयाल, उपेंद्र यादव, कर्ण शर्मा, यश ठाकूर, आदित्य सरवटे, अनिकेत चौधरी, आकाश मधवाल, मोहनराजे. खान आणि शिवम मावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT