Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्सचा लाडका कर्णधार ऋषभ पंतचा गेल्या वर्षी 30 डिसेंबरला भीषण अपघात झाला होता. या अपघातातून पंत हा नशीब बलवत्तर होतं म्हणून वाचला. यानंतर ऋषभ पंतच्या गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. आता पंतचं रिहॅबिलिटेशन सुरू असून तो काही महिन्यातच 100 फिट होईल अशी आशा आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने एक खास व्हिडिओ शेअर करत ऋषभ पंतच्या अपघापासून आजपर्यंतच्या खडतर प्रवासाचे वर्णन करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.
30 डिसेंबर 2022 रोजी पंत कारने आपल्या घरी जात होते आणि अपघाताच्या वेळी तो एकटाच होता. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्याची मर्सिडीज कार नियंत्रणाबाहेर गेली आणि रेलिंगला धडकली. यानंतर कारने पेट घेतला आणि ती पलटी झाली. गाडी चालवताना पंत झोपी गेला होता. यानंतर त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. पंतच्या डोक्याला, पाठीवर आणि पायाला जखमा होत्या.
भरधाव वेगात असलेली गाडी आधी दुभाजकावर आदळली आणि नंतर मजबूत लोखंडी बॅरिकेडिंगला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, गाडीने पलटी होऊन. सुमारे 200 मीटर अंतरावर घासत गेली. यानंतर गाडीला आग लागली. आग लागण्यापूर्वी पंत स्वत: गाडीची काच फोडून बाहेर आला त्यामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.