rishabh pant  esakal
क्रीडा

Rishabh Pant : बरोबर एका वर्षापूर्वी होत्याच नव्हतं झालं... ऋषभ पंतचं आयुष्यच बदलून गेलं

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant Car Accident : संपूर्ण जग 2022 ला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागलं होतं. तेवढ्यात एक मोठी बातमी आली. दिल्लीकडून रूरकीकडे जाताना भारताचा सुपरस्टार खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. त्याच्या गाडीने पेट देखील घेतला. ही बातमी ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला होता. कारण पेटणारी मर्सिडीज पाहून कोणालाही या गाडीतील व्यक्ती जीवंत राहील यांची खात्री नव्हती.

ट्रक ड्रायव्हर सुशील बनला देवदूत

मात्र नशीब बलवत्तर म्हणून ऋषभ पंत वाचला. पंतच्या गाडीला मोठा अपघात झाला त्यावेळी तेथून एक ट्रक जात होता. या ट्रकचा चालक सुशील पंतसाठी देवदूत म्हणून आला. त्याने पंतला मदत करत बाहेर काढले. पंत वाचला मात्र त्याला अनेक दुखापती झाल्या होत्या.

सुरूवातीला पंतच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समोर आले. मात्र त्यापेक्षा मोठी दुखापत त्याच्या पायला झाला होती. या दुखापतमुळे पंतचे आयुष्य एका झटक्यात बदलून गेलं.

पंत वाचला मात्र आयुष्यच बदलून गेलं

ऋषभ पंत या भीषण अपघातातून वाचला मात्र त्याचं आयुष्यच बदलून गेलं. त्याच्या पायला झालेल्या दुखापती पार गंभीर होत्या. सुरूवातीला त्याला हरिद्वारच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तेथे त्याच्यावर काही काळ उपचार केल्यानंतर त्याला देहराडूनला हलवण्यात आलं.

ऋषभ पंतसाठी हा काळ खूप कठिण गेला. तो शरिरावरील दुखापतीतून सावरत होता. मात्र त्याच्यावर मानसिक आघात देखील मोठा झाला होता. कारण त्याच्या गुडघ्यामधील लिगामेंट टिअर झालं होतं. एका विकेटकिपरच्या दृष्टीने गुडघे हा सर्वात महत्वाची गोष्ट असते. पंत साधा चालू देखील शकत नव्हता. या दुखापतींमुळे त्याच्या कारकिर्दीलाच धोका निर्माण झाला होता.

देहराडूनमध्ये काही काळ उपचार केल्यानंतर पंत गुडघ्याच्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी मुंबईला रवाना झाला. कोकिलाबेन रूग्णालयातील डॉक्टर दिनेश पारडीवाला यांनी पंतच्या गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया केल्या. यानंतर पंतला नव्याने सगळी सुरूवात करायची होती.

चालण्यापासून सर्व गोष्टी नव्याने मात्र हळूहळू करायच्या होत्या. क्रिकेटपटूच्या आयुष्यातील सर्वात कठिण गोष्ट म्हणजे दुखापत असते. ती जर गुडघ्याची दुखापत असेल तर तुमच्या मानसिकतेवर देखील मोठा परिणाम करते. कारण मैदानावर त्वेषाने पळणारा खेळाडू एका झटक्यात व्हील चेअरवर येतो. हातात कुबड्या येतात.

या परिस्थितीतून सावरणे मानसिकदृष्ट्या देखील आव्हानात्मक असते. मात्र पंतने एक एक टप्पा पार करत आपला फिटनेस पुन्हा मिळवण्याच्या दृष्टाने निश्चयाने प्रयत्न सुरू केले. त्याने आपली प्रगती वेळोवेळी इनस्टाग्रामवरून देखील शेअर केली.

एका वर्षानंतर काय हा पंतची स्थिती?

30 डिसेंबर 2022 च्या त्या काळरात्रीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र पंत अजूनही रिकव्हर होतोय. तो पुन्हा चालू लागला आहे. थोडं धावू लागला आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी जोर लावत आहे. जीममध्ये देखील तो घाम गाळत आहे. मात्र पंत पुन्हा मैदानावर परतण्यासाठी अजून थोडा अवधी लागणार आहे.

आयपीएल 2024 च्या लिलावात पंत दिसला होता. त्यामुळे तो आयपीएल खेळेल असे बोलले जात आहे. मात्र अधिकृतरित्या त्याबाबत अशी काही माहिती समोर आलेली नाही. कारण पंतला आधी आपला फिटनेस हा एनसीएमध्ये सिद्ध करावा लागणार आहे. त्यानंतर बीसीसीआयची वैद्यकीय टीम पंतला हळूहळू क्रिकेटच्या मैदानावर उतरवेल.

या वर्षभरात पंतने आयपीएल, ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका, वनडे वर्ल्डकप आणि अनेक महत्वाच्या स्पर्धा मिस केल्या आहेत. मात्र अशा परिस्थितीतही ऋषभ पंत सकारात्मक आहे. त्याने आयपीएल लिलावाला देखील हजेरी लावली होती. तसेच भारताच्या काही सामन्यांना देखील तो उपस्थित होता. ऋषभ पंतची ही रिकव्हरीची स्टोरी नक्कीच प्रेरणादाक आहे.

पंतने नुकतेच फलंदाजी करण्यास सुरूवात केली असून तो मैदानावर परतण्यासाठी लागणारा फिटनेस मिळवण्याच्या जवळ पोहचला आहे. तो लवकरात लवकर पूर्णपणे फिट होऊन मैदनावर परतावा हीच तमाम क्रिकेट रसिकांची इच्छा!

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT