Rishabh Pant IPL 2024 : भारताचा स्टार विकेटकिपर ऋषभ पंतच्या गाडीचा 2022 मध्ये अपघात झाला होता. या दुर्घटनेत पंत गंभीररित्या जखमी झाला. तेव्हापासून ऋषभ पंत हा एका वर्षापेक्षाही जास्त काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. ऋषभ पंत हा आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने पंतच्या पुनरागमनाबाबत मोठं वक्तव्य केलं.
दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंतच्या फॅन्ससाठी रिकी पाँटिंगने एक मोठी बातमी दिली. तो म्हणाला की पंत या वर्षीच्या आयपीएल हंगामात सर्व सामने खेळण्यााबबत आशावादी आहे. मात्र पंत विकेटकिपिंग आणि कर्णधारपद भूषणवणार की नाही हे अजून निश्चित झालेलं नाही.
गेल्या हंगामात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला चांगली कामगिरी करता आली नव्हती. आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 14 सामन्यांपैकी फक्त 5 सामने जिंकले होते.
रिकी पाँटिंग म्हणाला की, 'ऋषभ पंतला विश्वास आहे की तो खेळण्यासाठी फिट झाला आहे. तो संघात काय म्हणून खेळणार हे अजून निश्चित झालेलं नाही. तुम्ही सर्वांनी सोशल मीडियावरचे त्याचे व्हिडिओ पाहिले आहेत. तो चांगल्या प्रकारे धावत आहे. मात्र आपण पहिल्या सामन्यापासून फक्त सहा आठवडे दूर आहोत.'
'त्यामुळे तो या वरषी विकेटकिपिंग करणार की नाही याबाबत तो आश्वस्त नाहीये. मात्र मी खात्रीलायकपणे सांगू शकतो की जर मी पंतला विचारले तर तो सांगेल की मी सर्व सामने खेळणार आहे, विकेटकिपिंग करणार आहे. आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी देखील करणार आहे. तो त्याचा स्वभावच आहे.'
रिकी पाँटिंग पुढे म्हणाला की, 'पंत हा एक डायनामिक खेळाडू आहे. नक्कीच तो आमचा कर्णधार आहे. गेल्या वर्षी आम्हाला त्याची उणीव भासली. जर तुम्ही त्याचा गेल्या 12 ते 13 महिन्याचा प्रवास पाहिला तर तुम्हाला जाणवेल की तो अपघात किती भयंकर होता. पंत पुन्हा क्रिकेट खेळण्याची संधी मिळणे दूरची गोष्ट तो यातून वाचला यासाठी स्वतःला नशीबवान समजतो. आम्हाला आशा आहे की तो यंदाच्या हंगामासाठी उपलब्ध होईल. तो प्रत्येक सामना खेळणार नाही. मात्र आम्हाला वाटतं की तो नदान 10 सामने तरी खेळेल.'
पाँटिंगने सांगितले की जर पंत कर्णधारपद सांभाळण्यासाठी तयार झाला नाही तर हंगामात कॅप्टन्सी डेव्हिड वॉर्नर करणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.