Rishabh Pant sakal
क्रीडा

Rishabh Pant : तारीख ठरली! 'या' मालिकेत कमबॅक करणार ऋषभ पंत, अपघातानंतर खेळणार पहिला सामना?

Kiran Mahanavar

Rishabh Pant : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या वर्षाच्या सुरुवातीला एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. यानंतर तो आजून खेळापासून लांब आहे. 2023 च्या विश्वचषकापर्यंत पंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा होती.

पण प्रत्यक्षात त्याला खेळाच्या मैदानावर परत यायला अजून काही वेळ लागेल. त्याचबरोबर हा खेळाडू कोणत्या मालिकेसह संघात पुनरागमन करणार आहे, आता त्याचे वृत्त समोर आले आहे.

भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत 2024 मध्ये होणाऱ्या इंग्लंड मालिकेपूर्वी भारतीय संघात परतण्याची शक्यता आहे. भारत पुढील वर्षी जानेवारीत मायदेशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

स्पोर्ट्स टुडेच्या वृत्तानुसार, पंत पुढील वर्षी आयपीएलमध्येही खेळणार आहे. अनेक शस्त्रक्रियांनंतर पंतने आता चालायला सुरुवात केली आहे, आता तो लवकरच फलंदाजीलाही सुरुवात करेल असे अहवाल म्हटले आहे.

या अपघातानंतर पंतला बॉर्डर-गावसकर करंडक, आयपीएल आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसारख्या मोठ्या स्पर्धांमधून बाहेर पडला होता. भारतात होणाऱ्या आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेलाही तो मुकणार आहे.

पंतने 33 कसोटी सामने खेळले असून 43.67 च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत, त्यात पाच शतकांचा समावेश आहे. या 33 कसोटी सामन्यांमध्ये त्याने संघासाठी काही संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये त्याने 30 सामने खेळले आहेत आणि 34 च्या सरासरीने 965 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT