Rishabh Pant Playing Marbles with kids Viral Video esakal
क्रीडा

Rishabh Pant Viral Video : दिल तो बच्चा हैं जी...पुनरागमनाचं मोठं टेन्शन असूनही पंत रमला गोट्या खेळण्यात

Rishabh Pant Playing Marbles with kids Viral Video : भारताचा धडाकेबाज क्रिकटेपटू विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

रोहित कणसे

Rishabh Pant Video Playing Marbles with kids : यंदाच्या आयपीएल सिझनची सध्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यादरम्यान भारताचा धडाकेबाज क्रिकटेपटू विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आ व्हिडीओमधून पंत हा क्रिकेटमध्येच नाही तर देशी खेळांमध्येही चॅम्पियन असल्याचं समोर आलंय.

इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज असलेला पंत रविवारी त्याच्या घराजवळ मुलांसोबत गोट्या खेळताना दिसला. पंतने स्वत: त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने स्वतःचं तोंड झाकल्याचं पाहायला मिळत आहे.

यापूर्वी भारताचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुलीने माहिती दिली होती की ऋषभला एनसीएकडून 5 मार्च पर्यंत पुनरागमनासाठी फीट घोषित केलं जाईल. 31 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही.

22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 17 व्या सीझनमध्ये खेळण्यासाठी ऋषभ फीट झाला आहे. त्याचा फिटनेस हा दिल्ली फ्रँचायझी आणि भारतीय संघासाठी चांगली बातमी आहे. , गांगुलीने संकेत दिले होते की ऋषभला आयपीएलमध्ये थेट विकेटकीपिंची संधी दिली जाऊ शकत नाही.

विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्यामुळे पंत पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पंत गेल्या हंगामात आयपीएलमध्ये खेळला नव्हता. त्याएवजी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने त्याच्या जागी संघाचे नेतृत्व केले होते.

यंदा दिल्ली आपल्या जुन्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली लीगमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध 23 मार्च रोजी मोहाली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT