Rishabh Pant VIDEO  esakal
क्रीडा

Rishabh Pant VIDEO : आयुष्यातील ती मजा मिस करायची नाही यार... ऋषभ पंतने दिला गुरूमंत्र

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant VIDEO : भारतीय संघ सध्या 5 ऑक्टोबरपासून मायदेशात सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या तयारीला लागला आहे. भारतीय संघासमोर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आणि विकेटकिपर या दोन जागा भरण्याचे मोठे आव्हान आहे.

भारताचा पूर्णवेळ विकेटकिपर ऋषभ पंत अपघानंतरच्या दुखापतीतून अजून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी केएल राहुल विकेटकिपिंग करणार आहे. मात्र तो देखील दुखापतींनी त्रस्त आहे.

दरम्यान, ऋषभ पंत हा राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत आपल्या फिटनेसवर काम करत आहे. काही महिन्यापूर्वी आधार घेऊन चालणाऱ्या ऋषभ पंतची रिकव्हरी वेगाने होत आहे. तो आता नेटमध्ये फलंदाजी देखील करत आहे. सध्या सोशल मीडियावर ऋषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऋषभ पंत हा एका स्थानिक क्रिकेट सामन्यात चौकार आणि षटकारांची बरसात करताना दिसतो आहे. याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ऋषभ पंत युवा क्रिकेटपटूंना क्रिकेटचा आनंद घेण्याचा सल्ला देताना दिसतोय.

ऋषभ पंत एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाला की, 'जसजसं आपण मोठं होत जातो तसतसं आपण क्रिकेटचा आनंद घेणं, क्रिकेटवर प्रेम करणं विसरून जातो. याचं एक कारण म्हणजे तुमच्यावर खूप दबाव असतो. तुम्हाला आयुष्यत खूप काही मिळवायंच असतं. मात्र मित्रांनो आयुष्यातील तो आनंद मिस नाही करायचा.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT