Roger Federer : जगातील महान टेनिसपटू रॉजर फेडररने शुक्रवारी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. लेव्हर चषक 2022 टेनिस स्पर्धेत फेडरर अखेरचा सामना खेळला. या लेव्हर चषक सामन्यात त्याने राफेल नदालसोबत जोडी केली.
मात्र, दोन्ही दिग्गजांना हा सामना जिंकता आला नाही. अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक या जोडीचा 4-6, 7-6(2), 11-9 असा पराभव केला. यासह फेडररने ओल्या डोळ्यांनी टेनिसला अलविदा केला. यादरम्यान नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदालही आपले अश्रू आवरता आले नाहीत.
रॉजर फेडरर हा सध्याच्या युगातला टेनिसचा सम्राट म्हणून ओळखला जातो. फेडरर हा आपल्या शैलीदार टेनिस फटक्यांसाठी प्रसिद्ध होता. तो आपल्या सहजतेने मारलेल्या बॅकहँड फटक्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना अवाक करायचा. फेडररने आपल्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीत 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सहा ऑस्ट्रेलियन ओपन, एक फ्रेंच ओपन टायटल, आठ विम्बल्डन तर पाच युएस ओपन ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. त्याने 2018 ला आपले शेवटचे ग्रँडस्लॅम (ऑस्ट्रेलियन ओपन) जिंकले होते.
विशेष म्हणजे रॉजर फेडरर 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरूष टेनिसपटू ठरला होता. तो जवळपास 310 आठवडे एटीपीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर राहिला होता. तो तब्बल 237 आठवडे सलग रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. सर्वाधिक आठवडे रँकिंगमध्ये टॉपवर राहण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावर आहे. तसेच सलग पाच वर्षे युएस ओपन (2004 ते 2008) ग्रँडस्लॅम जिंकणारा तो एकमेव टेनिसपटू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.