Asia Cup 2022 : भारताचा माजी खेळाडू रोहन गावसकरने भारताचा सलामीवीर केएल राहुलबद्दल एक मोठं विधान केलं आहे. जर केएल राहुल हाँगकाँग विरूद्ध जशी बॅटिंग केली तशीच करत राहिला तर भारताची सलामी जोडी नक्की बदलेली असेल असे वक्तव्य रोहन गावसकरने केले आहे. (Rohan Gavaskar Says If KL Rahul Play Similar Like Hongkong Match Indian Opening Combination May Changed)
भारताने हाँगकाँगवर 40 धावांनी विजय मिळवला. मात्र भारताचा सलामीवीर केएल राहुलला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करण्यात अपयश आले आहे. हाँगकाँग विरूद्धच्या संध खेळपट्टीवर, गोलंदाज संथ गतीने गोलंदाजी करत असताना केएल राहुलला फलंदाजी करताना अडचण निर्माण होत होती. त्याने 39 चेंडूत केलेल्या 36 धावांच्या खेळीत फक्त दोन षटकारांचा समावेश आहे. याचबरोबर त्याने या खेळीत तब्बल 16 चेंडू निर्धाव घालवले. त्यापूर्वी पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात तो नसीम शाहच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला होता.
याबाबत एका क्रीडा चॅनलला मुलाखत देताना रोहन गावसकरने केएल राहुलवर टीका केली. तो म्हणाला की, 'मला माहिती आहे की तो एका मोठ्या गॅपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. दुखापतीमुळे तो जास्त काळ संघाबाहेर होता. त्याला कोरोना झाल्यामुळे वेस्ट इंडीज दौऱ्यावर फारशी संधी मिळाली नाही. जर तुम्ही त्याची बुधवारची हाँगकाँग विरूद्धची इनिंग पाहिली तर तुमची पहिला प्रतिक्रिया असेल की हाँगकाँग विरूद्ध 39 चेंडूत 36 धावा ही खूप संथ खेळी होती.'
रोहन गावसकर पुढे म्हणाला की, 'मला असं वाटतं की संघ व्यवस्थापन त्याला हाँगकाँग विरूद्धचा सामना ही फ्री हिट होती असं सांगले. तुम्हाला माहिती आहे की 1000 पैकी 999 वेळा तुम्ही हाँगकाँगविरूद्धचा सामना जिंकणार हे माहिती होतं. त्यामुळे ही फ्री हिट होती. केएल राहुलला फलंदाजीतील आपला सूर पुन्हा मिळवण्याची संधी होती.'
'जर केएल राहुल बुधवारी जशी फलंदाजी केली तशी पुढेही करत राहिला तर मला असे वाटते की आपल्याला सलामीच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल झालेला दिसेल. पण मला असं वाटतं की संघ व्यवस्थापनाकडून बुधवारच्या खेळीवेळी स्ट्राईक रेटचा विचार करून नको असा सल्ला मिळाला असण्याची शक्यता आहे. फक्त खेळपट्टीवर वेळ घालवण्याबाबत विचार करत, काही धावा कर आणि आत्मविश्वास मिळव असं संघ व्यवस्थापनाने सांगतलं असल्याची शक्यता आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्मविश्वासानं भरलेला केएल राहुल हा भारतासाठी मोठा प्लस पॉईंट आहे.' असंही रोहन गावसकर म्हणाला.
आशिया कपमध्ये आज ग्रुप A मधील पाकिस्तान - हाँगकाँग यांच्यात शेवटचा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता भारतासोबत 4 सप्टेंबरला सुपर 4 मध्ये भिडणार आहे. सप्टेंबरमधील सुपर संडेला भारत - पाकिस्तान सामना होण्याची दाट शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.