Asia Cup 2023 Team India Squad sakal
क्रीडा

Asia Cup 2023: रोहित शर्माच्या चॅम्पियन टीममधून 11 खेळाडू बाहेर, उपकर्णधारालाही धक्का, 4 जणांची कारकीर्द संपली

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Team India Squad : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया कपसाठी सज्ज झाली आहे. 17 सदस्यीय संघात कुलदीप यादवच्या रूपाने एका फिरकीपटूला स्थान मिळाले आहे. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि शार्दुल यांचा अष्टपैलू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याकडे असेल. ही स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे.

आशिया कपसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात केएल राहुल आणि इशान किशन हे यष्टिरक्षक म्हणून आहेत. रोहित शर्माशिवाय विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा हे फलंदाज आहेत. 2018 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शेवटचा आशिया कप जिंकला होता. त्या संघातील 11 खेळाडूंना आता वगळण्यात आले आहे. 2 खेळाडूंनी निवृत्तीही घेतली आहे. त्याचबरोबर शिखर धवनसह 4 खेळाडूंची संघात परतण्याची शक्यता खुप कमी आहे.

शिखर धवनशिवाय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक आणि केदार जाधव हे टीम इंडियाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याचवेळी, खलील अहमद, युझवेंद्र चहल, दीपक चहर, महेंद्रसिंग धोनी, मनीष पांडे, अंबाती रायडू आणि सिद्धार्थ कौल हे गेल्या आशिया कपमध्ये दिसलेले होते पण या संघाचा ते भाग नाहीत. धोनी आणि रायडू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

गेल्या आशिया कपमध्ये उपकर्णधार शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. धवनने 5 डावात 68 च्या सरासरीने 127 धावांची सर्वोत्तम कामगिरी करत 342 धावा केल्या. त्यात 2 शतके ठोकली होती. अंबाती रायडूने 6 सामन्यात 2 अर्धशतकांच्या मदतीने 175 धावा केल्या तर एमएस धोनीने 4 डावात 77 धावा केल्या.

विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने 5 डावात 146 धावा केल्या. 44 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. दुसरीकडे, केदार जाधवने 3 डावात 80 धावा केल्या आणि फिरकी गोलंदाज म्हणून 6 विकेट्सही घेतल्या.

2018 च्या आशिया कपमध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि लेग-स्पिनर युझवेंद्र चहल या दोघांनी 6-6 विकेट्स घेतल्या होत्या. दीपक चहरला एका सामन्यात संधी मिळाली आणि त्याने एक विकेट घेतली. डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने 2 सामन्यात 4 बळी घेतले. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने या स्पर्धेत सर्वाधिक 10 विकेट घेतल्या.

2023 आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघाबद्दल सांगायचे तर, तिलक वर्मा यांची प्रथमच वनडेसाठी निवड झाली आहे. अलीकडेच त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती. तेव्हापासून टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक दिग्गज त्यांला संघात स्थान देण्याबाबत बोलत होते. गेल्या वर्षी झालेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरेंनी लाज राखली ;वरळीचा गड राखला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT