Rohit Sharma Clarify Why He Chose Arshadeep Singh Over Mohammed Shami  esakal
क्रीडा

Rohit Sharma : शेवटचं षटक अर्शदीप सिंगलाच का दिलं; रोहित म्हणाला मी त्याला विचारलं...

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma India Defeat Bangladesh : टी 20 वर्ल्डकपमधील महत्वाच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव करत आपले सेमी फायनलमधील तिकिट बुक केले. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे बांगलादेशला 16 षटकात विजयासाठी 151 धावांचे टार्गेट देण्यात आले. भारातने पावसामुळे मिळालेल्या ब्रेकचा चांगला फायदा उचलत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. शेवटच्या षटकात 20 धावांची गरज असताना अर्शदीप सिंगने 10 धावा देत सामना जिंकून दिला. सामना झाल्यानंतर रोहित शर्माने अर्शदीप सिंगलाच शेवटचे षटक टाकण्यासा का दिला याचा खुलासा केला.

ज्यावेळी बांगलादेशला विजयासाठी शेवटच्या षटकात 20 धावांची गरज असताना रोहित शर्मासमोर मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग हे दोन पर्याय होते. मात्र रोहितने नवख्या अर्शदीपच्या हातात चेंडू सोपवला. याबद्दल सामना झाल्यानंतर हर्षा भोगले यांनी रोहितला याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, 'अर्शदीप सिंग ज्यावेळी वर्ल्डकप संघात आला त्यावेळी आम्ही त्याला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणार का असे विचारले होते. जसप्रीत बुमरहा संघात नव्हता. त्यामुळे कोणाला तरी ही जबाबदारी घ्यावी लागणार होती. अर्शदीप सिंग सारख्या कमी वयाच्या गोलंदाजाने ही जबाबदारी उचलणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र आम्ही त्याची पूर्वतयारी करून घेतली. गेल्या 9 महिन्यापासून तो यावर काम करत आहे.'

रोहित पुढे म्हणाला की, 'शेवटचे षटक टाकणाऱ्यासाठी आमच्याकडे मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग हे दोन पर्याय होते. आम्ही आमच्यासाठी यापूर्वी शेवटचे षटक टाकलेल्या गोलंदाजाला चेंडू देण्याचे ठरवले.' रोहित शर्मा विराट कोहलीच्या दमदार फॉर्मबद्दल म्हणाला की, 'विराट कोहली त्याच्या झोनमध्ये आधीपासून होता. फक्त एक दोन इनिंगचा विषय होता. त्याला आशिया कपमध्ये ती लय सापडली. आम्ही त्याच्या क्षमतेवर कधीच शंका उपस्थित केली नव्हती. तो ज्या प्रकारे वर्ल्डकपमध्ये फलंदाजी करतोय ते जबरदस्त आहे. तो ही कामगिरी आमच्यासाठी करतोय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

Imtiaz Jaleel : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतांच्या फुटीचा जलील यांना फटका

Devendra Fadnavis : फडणवीस यांचा विजयी ‘षटकार’

SCROLL FOR NEXT