Rohit Sharma Debut 15 Years Completed Share Emotional Letter  esakal
क्रीडा

रोहितने आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेअर केले 'खास' पत्र

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याला आज 15 वर्षू पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने रोहित शर्माने सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले. या पत्रात त्याने एक खेळाडू म्हणून माझ्या जडणघडणीमध्ये ज्यांचे योगदान आहे त्यांचे आभार मानले. (Rohit Sharma Debut 15 Years Completed Share Emotional Letter)

रोहित शर्माने 23 जून 2007 ला आयर्लंडविरूद्ध बेलफास्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आज या दिवसाच्या आठवणींना उजाळा देताने रोहितने एक पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले. रोहित शर्माने टीम इंडियाच्या जर्सीचा फोटो शेअर करत ट्विट केले की, 'माझ्या आवडत्या जर्सीला 15 वर्षे पूर्ण झाले.' याचबरोबर रोहित शर्मा पोस्ट केलेल्या पत्रात म्हणतो. 'मी त्या सर्वांचे आभार मानतो जे माझ्या या प्रवासात माझ्या बरोबर होते. ज्यांनी मला एक खेळाडू म्हणून तयार होताना मदत केली त्यांचे धन्यवाद. सर्व क्रिकेट प्रेमी, चाहते आणि टीकाकार तुमचे प्रेम आणि साथ याच्या जोरावरच मी अडचणींवर मात करू शकलो.'

35 वर्षाच्या रोहित शर्माने वनडे 230 सामन्यात 223 डावात फलंदाजी करत 9 हजार 283 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 48.60 इतकी आहे. यात 29 शतकांचा समावेश आहे. रोहितने आतापर्यंत 125 टी 20 सामने खेळत 3 हजार 313 धावा केल्या आहेत. यात चार शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत 45 सामन्यात 77 डावात 3 हजार 137 धावा केल्या आहेत. त्याची कसोटीतील सरासरी 46.13 अशी आहे. यात आठ शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

Latest Maharashtra News Updates : १०० टक्के मतदान करण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वोट फॉर रन मॅरेथॉनचं आयोजन

Winter Health : पौष्टिक आहारच वाढवेल प्रतिकारशक्ती

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

SCROLL FOR NEXT