Rohit Sharma Dinesh Karthik 
क्रीडा

Video : पहिल्या सामन्यात गळा धरला, आता गळ्यात पडला, रोहित म्हणजे ना...

सामन्याचा होता हिरो कर्णधार रोहित शर्मा पण दिनेश कार्तिकचे जितके कौतुक करावे तितके कमी

Kiran Mahanavar

Rohit Sharma Dinesh Karthik : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना नागपुरात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने चार चेंडू राखून सहा गडी राखून विजय मिळवला. सामन्याचा हिरो कर्णधार रोहित शर्मा होता. पण 37 वर्षीय अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.

खरे तर भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सातव्या षटकात बाद झाल्यानंतर चाहत्यांचे डोळे पाणावले. पण सहाव्या क्रमाने फलंदाजीला आलेल्या ब्लू आर्मीचा सर्वोत्तम फिनिशर कार्तिकने जास्त वेळ न थांबता भारतीय संघाला सहज विजय मिळवून दिला.

कार्तिकने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या डॅनियल सॅम्सला टारगेट केले. षटकात पहिल्या चेंडूवर लेग साइडमध्ये शानदार षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर शानदार चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने आज भारतीय संघासाठी एकूण दोन चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने 500.00 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 10 धावा काढल्या. यादरम्यान कार्तिकच्या बॅटमधून एक चौकार आणि एक जबरदस्त षटकार निघाला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात दिनेश कार्तिकने ना एलबीडब्ल्यू ना दोन वेळा एज बाद करण्याचे अपील केले. एकापाठोपाठ एक तीन चुका केल्यानंतर रोहितने कार्तिकवर चिडून त्याची गळा पकडली होता. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिल्यानंतर दिनेश कार्तिकला कर्णधार रोहित शर्मा मिठी मारली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

US Election : अमेरिकेला मिळणार पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष? कमला हॅरिस यांच्या गावी विजयाची उत्कंठा

SCROLL FOR NEXT