Rohit Sharma Extended Consecutive Wins In T20I India Defeat England In 2nd T20 Clinch Series esakal
क्रीडा

Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माचा विजयी रथ सुसाट; इंग्लंडला लोळवले

अनिरुद्ध संकपाळ

बर्मिंगहम : भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंचा संपूर्ण संघ 121 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारताने 49 धावांनी सामना जिंकत ज्या मैदानावर इंग्लंडने कसोटीत भारताला मात दिली होती त्याच एजबेस्टनमध्ये टी 20 सामन्यात भारताने इंग्लंडला मात देत मालिकेवर कब्जा केला. विशेष म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताच्या टी 20 संघाने सलग 14 सामने जिंकले आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा आधीच टॉप करत होता आता त्याने आपले रेकॉर्ड अजून एक्सटेंड केले. (Rohit Sharma Extended Consecutive Wins In T20I India Defeat England In 2nd T20 Clinch Series)

भारताकडून भुवनेश्वर कुमारने भेदक मारा करत तीन विकेट घेतल्या. त्याने इंग्लंडच्या जेसन रॉयला इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर बाद करत दमदार सुरूवात केली होती. त्याला भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून मोईन अलीने 35 तर डेव्हिड विलीने 33 धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना आपली सलामीची रणनिती बदलली. रोहित शर्मासोबत धडाकेबाज ऋषभ पंत सलामीला आला. या दोघांनी आक्रमक सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या पाच षटकात 49 धावा केल्या. मात्र त्यानंतर भारताची गळती सुरू झाली. पदार्पण करणाऱ्या ग्लेसनने रोहित (31), कोहली (1) आणि पंत (26) यांना बाद केले.

त्यानंतर भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. मात्र भारताची अवस्था 5 बाद 89 अशी झाली असताना रविंद्र जडेजाने झुंजार खेळी करत भारताला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. त्याने नाबाद 46 धावा करत भारताला 170 धावांपर्यंत पोहचवले. त्याला हर्षल पटेलने 13 तर दिनेश कार्तिकने 12 धावा करत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून क्रिस जॉर्डनने चार आणि डेब्युटन ग्लेसनने तीन विकेट घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT