Rohit-Sharma AFP
क्रीडा

INDvsENG: रोहितची झुंजार फिफ्टी! पुजाराच्या साथीने सावरला डाव

विराज भागवत

Ind vs Eng 3rd Test Day 3 Live Updates: दुसऱ्या सत्रात टीम इंडियाचा दमदार कमबॅक

Ind vs Eng 3rd Test Day 3 Tea Break Updates: भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल स्वस्तात बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जोडीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी दमदार खेळी करत संघाला शंभरी गाठून दिली. चहापानाची विश्रांती होईपर्यंत या दोघांनी संघाला ११२ धावांची मजल मारून दिली. रोहित (५९*) आणि पुजारा (४०*) या दोघांनीही दुसरे सत्र संपेपर्यंत संयमी पण वेगवान खेळी करत ७८ धावांची नाबाद भागीदारी केली.

पहिल्या सत्रात यजमान इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर आटोपला. त्यांनी ३५४ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाची दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. सुमारे १८ षटके खेळून काढल्यानंतर लोकेश राहुल ८ धावा काढून बाद झाला. त्याने ५४ चेंडूंचा सामना केला पण ओव्हरटनच्या आऊटस्विंग चेंडूवर तो बाद झाला आणि तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ थांबवण्यात आला.

त्याआधी, इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी भारताचा डाव ७८ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी सलामी दिली. रॉरी बर्न्स (६१) आणि हमीद हसीब (६८) हे दोघे बाद झाल्यावर कर्णधार जो रूट आणि डेव्हिड मलानने डाव सांभाळला. या दोघांनी १३९ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांचे कंबरडं मोडलं. रूटने मालिकेतील तिसरं शतक (१२१) ठोकले. मलाननेही ७० धावा केल्या. त्यानंतरच्या फलंदाजांना फारशी चांगली खेळी करता आली नाही. ओव्हरटनच्या ३२ धावांमुळे इंग्लंडने ४००चा टप्पा पार केला, पण अखेर त्यांचा डाव ४३२ धावांवर आटोपला. मोहम्मद शमीने ४ तर बुमराह, जाडेजा, सिराजने २-२ बळी घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT