कोलकाता नाईट राडर्सने (Kolkata Knight Riders) श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) आपला कर्णधार घोषित केले. मात्र त्याच दिवशी कोलकात्यात झालेल्या वेस्ट इंडीज बरोबरच्या पहिल्या टी 20 सामन्यात श्रेयस अय्यरला बेंचवर बसावे लागले. आयपीएल मेगा लिलावात (IPL 2022 Auction) केकेआरने अय्यरला 12.25 कोटी रूपयांना खरेदी केले. असे असले तरी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एका वक्तव्यामुळे श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बसत नसल्याचे संकेत मिळाले. याचबरोबर टी 20 वर्ल्डकप संघातही श्रेयस अय्यरच्या स्थानाबद्दलही त्याने खुलासा केला.
भारताने वेस्ट इंडीज विरूद्धचा पहिला टी 20 सामना 6 विकेट्सनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. सामना झाल्यानंतर रोहित शर्माने आपल्या टीम कॉम्बिनेशनबाबत (Team Combination) एक वक्तव्य केले. हे वक्तव्य नुकातच केकेआरचा कर्णधार झालेल्या श्रेयस अय्यर बाबत होते. रोहित म्हणाला की, 'श्रेयस अय्यर सारखा चांगला खेळाडू हा संघाबाहेर बसला आहे. श्रेयस अय्यर बाबतचा हा कठोर निर्णय आहे. पण, संघाची ती गरज आहे. आम्हाला मधल्या फळीत असा फलंदाज हवा आहे की जो गोलंदाजी देखील (All Rounder) करू शकेल. तसंही संघात अशा प्रकारची स्पर्धा असणं चांगलं असतं.'
रोहित शर्माने श्रेयस अय्यर बाबत भुमिका स्पष्ट केली. तो म्हणाला की, 'आम्ही श्रेयस अय्यरला ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की, संघाला एक अष्टपैलू पर्याय हवा आहे. आम्ही वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अष्टपैलू पर्याय घेऊनच मैदानात उतरणार आहोत. संघातील सर्व खेळाडू स्मार्ट आहेत, व्यावसायिक आहेत. त्यांना संघ प्रथम येतो याची जाणीव आहे.' याचबरोबर रोहितने टी 20 संघात सूर्यकुमार यादव सारख्या 360 खेळाडूचे महत्व देखील अधोरेखित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.