Rohit Sharma sakal
क्रीडा

Rohit Sharma : टीम इंडियाला सेमीफायनलपूर्वी मोठा धक्का, कर्णधार रोहितला दुखापत!

सरावादरम्यान रोहित शर्मा जखमी, टीम इंडिया 10 नोव्हेंबरला उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडणार

Kiran Mahanavar

Rohit Sharma Injured : टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत 10 नोव्हेंबरला टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाला आहे. सरावादरम्यान रोहित शर्माच्या उजव्या हाताला दुखापत झाली.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी नेटमध्ये फलंदाजी करताना मनगटाची दुखापत झाली होती. कर्णधार रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या मनगटावर दुखापत झाली. मात्र, आता रोहित शर्माने पुन्हा सराव सुरू केला आहे. कर्णधार रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे, याचा अंदाज बांधता येणार नाही. पण रोहित शर्माची दुखापत गंभीर झाल्यास इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठीही ही निराशाजनक बाब असेल.

उपांत्य फेरीत टीम इंडिया 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत ब गटातून भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ अ गटातून पोहोचले आहेत. पहिला उपांत्य सामना 9 नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT