Rohit Sharma Test Captaincy Virat Kohli esakal
क्रीडा

Rohit Sharma Test Captaincy : रोहित जाणार विराट पुन्हा कर्णधार होणार; BCCI समोर आहेत तीन पर्याय?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Test Captaincy Virat Kohli : भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली. पहिल्या फायनलमध्ये पावसाने पहिल्याच दिवशी खेळ केला. याचा परिणाम कसोटीच्या निकालावर झाला. मात्र दुसऱ्या WTC Final मध्ये भारताने नाणेफेक जिंकली होती. खेळपट्टी हिरवी गार होती. तरी देखील भारताच्या पदरी पराभवच पडला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा ठोकल्या. त्याच्या प्रत्युतरात भारताला फक्त 296 धावाच करता आल्या. पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतल्यानंतर कांगारूंनी आपला दुसरा डाव 270 धावांवर घोषित केला. यामुळे भारतासमोर विजयासाठी 444 धावांचे मोठे आव्हान उभे राहिले. दुसऱ्या डावात भारताला 234 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने सामना 209 धावांनी गमावला.

या सामन्यात रोहित शर्माने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या रविचंद्रन अश्विनला खेळवले नव्हते. यावरून मोठा वाद झाला अनेक माजी क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या संघात तब्बल 5 डावखुरे फलंदाज असतानाही अश्विनला का खेळवण्यात आले नाही असा सवाल केला. भारताचा WTC Final मध्ये पराभव झाल्यानंतर कसोटी क्रिकेट खेळताना कायम विश्रांतीवर जाणाऱ्या रोहित शर्माला कसोटी कर्णधारपद गमवावे लागू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे.

रोहित भारताच्या तीनही फॉरमॅटचा कर्णधार आहे. आता पुढचे WTC सर्कल हे 2023 ते 2025 असे असणार आहे. या दरम्यान, भारतीय कसोटी संघाची धुरा कोणाकडे सोपवण्यात येईल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यासाठी सध्या तरी तीन नावे प्रामुख्याने चर्चेत आली आहेत.

विराट कोहलीकडे पुन्हा कर्णधारपद जाणार?

विराट कोहलीने 2022 मध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोडले होते. मात्र काही दिवसातच बीसीसीआयचे तत्कालीन अधिकारी आणि विराट कोहलीमध्ये वाद झाल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे त्याने कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्याची चर्चा होती.

विराट कोहलीने नुकतेच काही सामन्यात आरसीबीची कॅप्टन्सी केली होती. आता बीसीसीआयचे अधिकारी देखील बदलले आहेत. जर नवीन निवडसमिती आणि अध्यक्ष कोहलीला पुन्हा कर्णधार होण्यासाठी मनवू शकले तर भारतीय कसोटी संघाची धुरा खांद्यावर घेण्यासाठीचा तो एक पर्याय ठरू शकतो.

अजिंक्य रहाणेच्या डोक्यावर सजणार काटेरी मुकूट?

भारतीय कसोटी संघाचा कधीकाळचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने तब्बल 18 महिन्यानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले. त्याने WTC Final सारख्या हाय व्होल्टेज सामन्यात पहिल्या डावात 89 धावांची झुंजार खेळी करत भारताची लाज वाचवली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात 46 धावा करत आपण पुन्हा फॉर्ममध्ये परतलो असल्याचे संकेत दिले.

अजिंक्य रहाणेने कसोटीत कर्णधारपदही भूषवलं आहे. भारताने 2020 - 21 मध्ये ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्याची किमया केली होती. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेनेच केले होते. जर भारत 2023 ते 25 या WTC च्या तिसऱ्या सर्कलपुरताच विचार करत असेल तर त्यांच्या दृष्टीने अजिंक्य रहाणे हा उत्तम पर्याय आहे.

तरूण शुभमन गिलच्या खांद्यावर येणार का मोठी जबाबदारी?

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल हा फक्त 23 वर्षाचा आहे. मात्र त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवलं आहे. त्याने भारतीय संघातील आपली जागा पक्की केली असून त्याने आपल्या फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना चांगलेच प्रभावित केले आहे.

शुभमन गिलने यापूर्वी कधीही भारताचे नेतृत्व केलेले नाही. मात्र 2019 - 20 मध्ये देवधर ट्रॉफीत भारताच्या 'क' संघाचे नेतृत्व केले आहे. भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, मयांक अग्रवाल आणि अक्षर पटेल हे त्याच्या नेतृत्वाखाली खेळले होते.

गिलने वनडेत शतकी खेळी केल्यानंतर सुनिल गावसकर यांनी त्याचे कौतुक करताना त्याच्या खांद्यावर 35 वर्षाच्या खेळाडूसारखं डोकं आहे. त्याच्याकडे आता अनुभवाची थोडी शिदोरी देखील आहे. त्यामुळे गिल हा पुढच्या सहा वर्षासाठी भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि केएल राहुल सारखे अनुभवी खेळाडू संघात असतीलच.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT