India Vs Sri Lanka 1st ODI : भारताने पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेसमोर 50 षटकात 7 बाद 373 धावा उभारल्या. भारताकडून विराट कोहलीने 87 चेंडूत 113 धावा ठोकत सलग दुसरे शतक ठोकले. मात्र सलामीवीर रोहित शर्माला आपले शतक पूर्ण करता आले नाही. तो 67 धावात 83 धावा करून बाद झाला. या दोघांपाठोपाठ शुभमन गिलने देखील 70 धावांचे योगदान दिले.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 20 षटकातच धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने पहिल्या पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरूवात केली. त्यानंतर शुभमन गिलने देखील गिअर बदलत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र 60 चेंडूत 70 धावा केल्यानंतर तो बाद झाला.
गिल बाद झाल्यानंतर रोहितने फटकेबाजी करत संघाला 170 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र शतकाच्या जवळ पोहचला असताना मधुशानकाने त्याला 83 धावांवर बाद केले. रोहित बाद झाल्यावर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने भारताचे द्विशतक धावफलकावर लावले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी रचली होती.
मात्र धनंजया डे सिल्वाने अय्यरला 28 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. अय्यर बाद झाल्यावर केएल राहुल विराटला साथ देण्यासाठी आला. या दोघांनी आक्रमक भागादारी रचत संघाल 41 व्या षटकाच 300 च्या पार पोहचवले. दरम्यान विराट कोहलीचे अर्धशतक देखील पूर्ण झाले होते.
विराटने अर्धशतकानंतर आपला गिअर बदलला. दरम्यान, राहुल 39 धावा करून बाद झाला होता. मात्र विराटने वनडेमधील आपले सलग दुसरे शतक ठोकले. त्याने 87 चेंडूत 113 धावा ठोकत भारताला 350 पार पोहचवले. मात्र तो शेवटची दोन षटके राहिले असताना तो बाद झाला. भारताने 50 षटकात 7 बाद 373 धावांपर्यंत मजल मारली.
हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.