Rohit Sharma India Vs West Indies 2nd Test esakal
क्रीडा

Rohit Sharma : रोहित शर्माने धोनीला मागं टाकत केला मोठा विक्रम; आता सौरव गांगुली रडारवर

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma India Vs West Indies 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पहिल्या सत्रात तरी रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवालच्या पथ्यावर पडला.

या दोघांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या सत्रातच 130 धावा धावफलकावर लावल्या. रोहित शर्माने पहिल्या कसोटीत 103 धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 80 धावांची दमदार खेळी केली. त्याने यशस्वीसोबत 139 धावांची सलामी दिली.

याचबरोबर रोहित शर्माने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला देखील मागे टाकले. (Rohit Sharma News)

रोहित शर्माने 443 आंतरराष्ट्रीय सामन्यात 17300 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता पाचव्या स्थानावर पोहचला आहे. त्याने या यादीत महेंद्रसिंह धोनीला (Mahaendra Singh Dhoni) मागे टाकले. या यादीत विराट कोहली हा एकमेव सध्या खेळत असलेला फलंदाज त्याच्या पुढे आहे.

महेंद्रसिंह धोनीने कसोटी, वनडे आणि टी 20 सामन्यात मिळून 17266 धावा केल्या आहेत. धोनीने यासाठी 538 सामने खेळले आहेत. तो सध्या भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.

या यादीत पहिल्या स्थानावर 664 सामन्यांच्या 34357 धावा करून सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे. यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण 500 सामन्यात 25641 धावा केल्या आहेत.

या यादीत विराट कोहलीनंतर तिसऱ्या स्थानावर राहुल द्रविडचा नंबर लागतो. त्याने 504 सामन्यात 24064 धावा केल्या. सौरव गांगुली 421 सामन्यात 18433 धावा करत चौथ्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या रडारवर आता सौरव गांगुली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन...

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

SCROLL FOR NEXT