ऑस्ट्रेलियातील क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूने 2021 च्या वर्षातील बेस्ट टेस्ट टीम निवडलीये. चार भारतीयांना स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma), ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), अक्षर पटेल (Axar Patel) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) या चार भारतीयांनी ऑस्ट्रेलियाला चांगलेच प्रभावित केले आहे. रोहित शर्माने या वर्षात आपल्या भात्यातून तुफान फटकेबाजीचा नजराणा दाखवून देत भारताबाहेरही सहज धावा करुन शकतो हे दाखवून दिले आहे.
या वर्षात अनेक सामन्यात त्याने टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. जो रूट पाठोपाठ सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 11 सामन्यात 47.68 च्या सरासरीनं 906 धावा केल्या आहेत. जो रुट 15 सामन्यात 1708 धावांसह कसोटीत अव्वल राहिलाय.
रिषभ पंतने ऑस्ट्रेलियात कमालीची कामगिरी करुन दाखवली होती. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 97 (सिडनी ), 89* (ब्रिस्बेन ) आणि मायदेशात खेळताना चेन्नईच्या मैदानात 91 धावांची बहरदार खेळी केली होती. त्याला शतक साजरे करण्यात अपयश आले असले तरी या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होत्या. त्याच्या या इनिंग मॅच विनिंग ठरल्या होत्या. गोलंदाजीमध्ये रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना चांगलेच नाचवलं. या दोघांनी अनुक्रमे 16.64 आणि 11.86 च्या सरासरीनं 54 आणि 36 विकेट घेतल्या. बेस्ट टेस्ट टीममध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकमेव मार्नस लाबुशेनचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने जो 12 सदस्यीय संघ निवडलाय त्या संघाचे नेतृत्व हे श्रीलंकन दिमुथ करुणारत्नेकडे देण्यात आले आहे. जलदगती गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा जेमीसन आणि शाहिन शाह आफ्रिदी यांचाही समावेश दिसतो. क्रिकेट ऑस्ट्रेलिया टेस्ट इलेव्हन 2021 : रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), मार्नस लाबुशेने, जो रूट, फवाद आलम, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवि अश्विन, कायले जेमीसन, अक्षर पटेल, हसन अली, शाहीन शाह आफ्रीदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.