Rohit Sharma World Cup 2023 Team India Squad esakal
क्रीडा

Rohit Sharma : युवराजनंतर कोण मिळाला नाही.... कोणाचंही स्थान पक्क नाही! रोहितनं विराटलाही दिलं टेन्शन

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma World Cup 2023 Team India Squad : भारताचा कर्णधार रोहित शर्माने वनडे वर्ल्डकप 2023 च्या संघनिवडीबाबत मोठमोठी विधाने केली आहेत. यामुळे संघातील रथीमहारथींचा धाबे दणाणले आहेत. भारतीय संघासाठी गेल्या काही वर्षापासून चौथ्या क्रमांकावर कोण हा प्रश्न भेडसावत आहे.

युवराजच्या निवृत्तीनंतर त्या स्थानावर कोणताही एक फलंदाज स्थिरावू शकला नसल्याचे मत रोहित शर्माने व्यक्त केले. भारतात होणारा वनडे वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर आला असताना खुद्द कर्णधाराने अशी वक्तव्य केल्याने अनेक प्रश्न उपस्थितीत झाले आहे. (Rohit Sharma Statemen About No 4 Batsmen)

रोहित शर्माने ला लीगाच्या एका कार्यक्रमावेळी पत्रकारांना मुलाखत दिली. यावेळी त्याने चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवायचं याबद्दल आपलं मत व्यक्त केले. तो म्हणाला की, 'चौथ्या क्रमांकावर कोण हा प्रश्न भारतीय संघाला गेल्या अनेक वर्षापासून सतावतोय. युवराज सिंगनंतर या क्रमांकावर कोणताही फलंदाज सेटल झाला नाही.' (Yuvraj Singh)

'मात्र गेल्या काही काळापासून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा सातत्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. त्याने चांगली कामगिरी देखील केली आहे.'

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'मात्र गेल्या काही काळापासून तो दुखापतींनी ग्रासला आहे. तो बराच काळ संघापासून दूर आहे. गेल्या चार ते पाच वर्षात हे सातत्यानं होत आहे. आमचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहे. त्यामुळे आम्हाला कायम नव्या खेळाडूच्या शोधात रहावे लागते.'

'ज्यावेळी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होतो किंवा तो उपलब्ध राहू शकत नाही, त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी आजमावता, तुम्ही वेगवेगळे खेळाडू आजमावता. चौथ्या क्रमांकाबाबत देखील हेच झालं आहे.'

'मी कर्णधार नव्हतो तेव्हाही मी पाहत होतो की चौथ्या क्रमांकासाठी अनेक खेळाडू आले अन् गेले. दुखापतींमुळे ते बाहेर गेले किंवा ते उपलब्ध राहू शकले नाहीत. काहींना आपला फॉर्म गमवावा लागला.'

भारत पाचव्या क्रमांकावर केएल राहुलचा (KL Rahul) विचार करत आहे. तो भारताचा पहिल्या पसंतीचा विकेटकिपर देखील आहे. राहुल आणि श्रेयस हे दुखापतीतून सावरत आहेत. रोहितने त्यांच्या फिटनेसबाबत माहिती दिली. याचबरोबर रोहितने कोणाचेही संघातील स्थान पक्के नसल्याचे सांगितले.

रोहित म्हणाला, 'कोणचीही सहज निवड होणार नाहीये. माझी देखील नाही. आमच्या संघात कोणाचेही स्थान शाश्वत नाही. आम्ही कोणालाही सांगत नाही की तुझं स्थान कायम राहील.'

'होय काही खेळाडूंना माहिती आहे की ते खेळणार आहे. मात्र आताच्या घडीला, वेस्ट इंडीजमधील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर आम्हाला काही खेळाडूंवर विचार करण्याची संधी मिळाली आहे. आशिया कपमध्ये देखील आम्ही काही पर्याय चाचपून पाहणार आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT