Rohit Sharma ODI Record IND vs NZ 3rd ODI esakal
क्रीडा

Rohit Sharma : धोनी - सचिन करू शकले नाहीत ते रोहितनं करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma ODI Record IND vs NZ 3rd ODI : भारताचा कर्णधार रोहित शर्मा शतक कधी करणार याची उत्सुकता आणि चर्चा होती. अखेर 16 महिन्यांनी रोहित शर्माच्या बॅटमधून शतकी खेळी आली. त्याने 85 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या शतकी खेळबरोबरच रोहित शर्माने एका मोठा कारनामा देखील केला. असा कारनामा भारताचे महान फलंदाज सचिन, विराट आणि धोनीला देखील करता आला नव्हता.

शुभमन गिल (112 धावा) सोबत 212 धावांची सलामी देणारा रोहित शर्मा पहिल्या पॉवर प्लेमध्ये हातचं राखून खेळत होता. मात्र दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये त्याने आक्रमक अवतार धारण केला. त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करण्यास सुरूवा केली. रोहितच्या आधी अर्धशतकी खेळी करणाऱ्या गिलला रोहितने शतकाच्या रेसमध्ये मागे टाकले. रोहितने आपल्या 30 व्या वनडे शतकी खेळीत 6 षटकार आणि 9 चौकार मारले.

हिटमॅन रोहित शर्माने आपल्या इनिंगमधील तिसरा षटकार मारला आणि तो भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने जगात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले. रोहित शर्माचे आता वनडेमध्ये 273 षटकार झाले आहेत. त्याच्यापुढे आजून ख्रिस गेल (331) आणि शाहिद आफ्रिदी (351) हे दोन फलंदाज आहेत.

भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा (273) पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर 229 षटकार मारणारा महेंद्रसिंह धोनी आहे. 195 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर येतो. तर सौरभ गांगुलीने 190 षटकार मारत चौथे स्थान पटकावले आहे.

वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

351 षटकार - शाहिद अफ्रिदी (पाकिस्तान)

331 षटकार - ख्रिस गेल (वेस्टइंडीज)

273 षटकार - रोहित शर्मा (भारत)

270 षटकार - सनथ जयसूर्या (श्रीलंका)

229 षटकार - महेंद्र सिंह धोनी (भारत)

(Sports Latest News)

हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT